spot_img
अहमदनगरParner News: शेतकरी चिंतेत मग्न, अधिकारी सुट्टीमध्ये दंग! गारपीट ग्रस्तांच्या पदरी निराशा

Parner News: शेतकरी चिंतेत मग्न, अधिकारी सुट्टीमध्ये दंग! गारपीट ग्रस्तांच्या पदरी निराशा

spot_img

पारनेर/शरद झावरे-
२६ नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील ४९ गावांना गारपीटीचा फटका बसला. महिना उलटूनही एक रूपयांची शासकीय मदत न मिळाल्याने शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. प्रशासन पंचनामे करण्याचा सोपस्कार उरकून मोकळे झाले असून उध्वस्त बळीराजाचे डोळे शासकीय मदतीकडे लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.

पारनेर तालुक्यात झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे १२ हजारावर हेक्टरला फटका बसला आहे. गारपीटीमध्ये शेतीपीके, फळबागा व जनावरांच्या चार्‍याचेही मोठे नुकसान झाले होते. त्यात तालुक्यातील ४९ गावे बाधित झाली आहेत. या आवकाळी पावसाचा व गारपिटीचा फटका तालुक्यातील १० हजार ४५२ शेतकर्‍यांना बसला आहे.

शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाई पोटी १० कोटी ५४ लाख रूपयांची मागणी प्रशासनाच्या वतीने सरकारकडे करण्यात आली आहे. गारपीटीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान पारनेर तालुक्यात झाले आहे. नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. प्रामुख्याने सर्वाधिक फटका पानोली, वडूले, सांगवी सूर्या व गांजीभोयरे या चार गावांना बसला आहे. पिंपळनेर, जवळा, राळेगण थेरपाळ व निघोज परीसरातील शेतीपिकांसह जनावरांचा चारा व फळबांगाचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या कांद्याचे बाजार कमी झाले आहेत. या शिवाय दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहेत. त्यामुळे शेतकरी मुळातच हवालदिल झाला आहे. तालुक्यातील खरीप पिके कमी पावसामुळे वाया गेली होती. रब्बीलाही गारपीटीमुळे मोठा फटका बसला आहे.

शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली
महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन वेळा पारनेर तालुक्यातील जवळा, सांगवी सूर्या, वडुले, पानोली आदी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करत शेतकर्‍यांशी संवाद साधला होता. जिल्हाधिकार्‍यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे सादर करून महिना उलटला मात्र शेतकरांच्या तोंडाला अद्याप पाने पुसली आहेत.

गारपीट ग्रस्तांना एकरी ५० हजारांची भरपाई द्यावी
शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपोटी एकरी किमान ५० हजार रूपये देणे गरजेचे आहे. कांदा पिकाला तेवढा खर्च येतो. इतरही फळबागांचे व पिकांचे नुकसान पाहता जास्तीत जास्त रक्कम शेतकर्‍यांना मिळणे गरजेचे आहे
– रामा गाडेकर, पानोली. शेतकरी.

शेतात जाऊन काळजीपूर्वक पंचनामे
तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकारी यांनी एकत्रित नुकसानीचे पंचनामे शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन काळजीपूर्वक केले आहेत. नुकसानीपोटी शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या रकमेची मागणीही केली आहे अता सरकारकडून नुकसान भरपाई येताच शेतकर्‍यांना मिळणार आहे.
-गजानन घुले, तालुका कृषी अधिकारी, पारनेर.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगरच्या ‘या’ गावात धाडसी दरोडा! चोरीत चोरटे निघाले हुशार? नेमकं काय घडलं…

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणार्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी...

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...