spot_img
अहमदनगरAhmednagar News : शासकीय जागेतील अतिक्रमण नडले, जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचाला अपात्र ठरवले

Ahmednagar News : शासकीय जागेतील अतिक्रमण नडले, जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचाला अपात्र ठरवले

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतच्या सरपंच जिजाबाई गजानन मते यांना एकत्रित कुटुंबाचे अतिक्रमण असल्यामुळे अपात्र करण्याचा आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिला.

रांजणगाव देशमुख या ग्रामपंचायतच्या सरपंच जिजाबाई गजानन मते यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे शासकीय जागेवर व्यावसायिक अतिक्रमण होते. यामुळे त्यांना सरपंच पदावरून अपात्र करावे या साठी अशा गोरडे व प्रकाश गोरडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज सादर केला होता. यावर सुनावणी झाली. या प्रकरणात गट विकास अधिकारी यांकडून अहवाल मागविण्यात आला होता. तसेच बांधकाम विभागाकडूनही अहवाल मागविण्यात आला होता.

सदरील सुनावणी दरम्यान अर्जदार व सामनेवाले सरपंच या दोघांचा युक्तिवाद जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतला. यात एकत्रित कुटुंबियांचे सरकारी मिळकतीवर अतिक्रमण असल्याचे समोर आले. झाल्यामुळे सरपंच जिजाबाई गजानन मते यांना अपात्र करण्याचा निर्णय घोषित केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कर्जदार शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे ‘हे’ महत्वाचे आवाहन !

अहमदनगर / नगर सहयाद्री : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे...

Ahmednagar News : चिंग्या साथीदारासह जेरबंद, जामखेडमध्ये मुकादमावर केला होता गोळीबार

अहमदनगर / नगर सहयाद्री : जामखेड गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने...

आमदार जगताप यांचे नगरकरांना गिफ्ट! ‘या’ रस्त्यासाठी १५० कोटी मंजूर

अहमदनगर। नगर सहयाद्री- नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या ३०८ कोटी रुपयांच्या प्रस्तावातील कामांना...

‘मार्केटींग फेडरेशन अजित पवार गटाकडे’

श्रीगोंदा | नगर सह्याद्री राज्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशन या संस्थेच्या...