अहमदनगर। नगर सहयाद्री-
गेल्या काही दिवसात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. यामध्ये १४ ते १७ वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून, या प्रकारचे गुन्हे पालकांसोबत पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत.
जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहरात दररोज एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.
आता पुन्हा राहुरी तालुक्यातून एका अल्पवयीन मुलीला जावयाने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. तर अकोले तालुक्यातील बारीगाव येथे लग्नातून १७ वर्षांच्या मुलीला पळवून नेण्यात आले आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या तीन घटना जिल्ह्यातून समोर आल्या आहे.