spot_img
ब्रेकिंगप्रदेशाध्यक्ष पटोलेंचा गाडीचा अपघात की घातपात..! विरोधी पक्षाला संपवून भाजपला जिंकायच का?...

प्रदेशाध्यक्ष पटोलेंचा गाडीचा अपघात की घातपात..! विरोधी पक्षाला संपवून भाजपला जिंकायच का? ‘यांनी’ साधला निशाणा

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी समोर आली असून अपघात की घातपात? यांबाबत संशय व्यक्त करत अतुल लोंढे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

अधिक माहिती अशी: भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काल रात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

त्यावरुन काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्षाला संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल उपिस्थत करत अपघात नसून घातपाताचा प्रयत्न असू शकतो, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.

भंडाराजवळ आमच्या गाडीला एक ट्रकने मुद्दामहुन धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाडी एका बाजूने घासत घासत पुढे गेली. या अपघातामध्ये मला काहीही झालेलं नाही. परंतु गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. जनतेच्या आशिर्वादामुळे मी व्यवस्थित आहे.

– प्रदेशअध्यक्ष नाना पटोले

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...

उन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....