spot_img
महाराष्ट्रभुजबळांच्या उमेदवारीची फक्त चर्चा तरी वातावरण तापले, ठिकठिकाणी गावबंदीचे बॅनर

भुजबळांच्या उमेदवारीची फक्त चर्चा तरी वातावरण तापले, ठिकठिकाणी गावबंदीचे बॅनर

spot_img

नाशिक / नगर सह्याद्री : साताऱ्याच्या बदल्यात राष्ट्रवादीला नाशिकची जागा मिळू शकते असे म्हटले जात आहे. तेथे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतील असा अंदाज आहे. मात्र, त्यांना उमेदवारी देऊ नये या मागणीसाठी नाशिक तालुक्यातील काही गावांमध्ये सकल मराठा समाजाने ठीक ठिकाणी होर्डिंग उभारण्यास सुरुवात केली आहे.

अर्थात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून उभारलेले होर्डींग काढले आहे. त्यामुळे काहीवेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी होर्डींग काढले असले तरी नाशिक तालुक्यातील प्रत्येक गावात अश्या स्वरूपाचे होर्डींग उभारले जाणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजातर्फे दिला जातो आहे.

मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण मिळू नये, तसेच त्याविरोधात महाराष्ट्रात ठीक ठिकाणी सभा घेऊन छगन भुजबळ यांनी विरोध केला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात देखील भुजबळ यांनी वैयक्तिक पातळीवर जात एकेरी टीका केली होती.

आता नाशिक लोकसभा मतदार संघात भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू होताच येथील सकल मराठा समाजाने भुजबळांना उमेदवारी मिळू नये, यासाठी गाव पातळीवर होर्डींग उभारून भुजबळांच्या उमेदवारीला विरोध करत भाजप व राष्ट्रवादी समोर दबाव तंत्राचा वापर सुरू करण्यास सुरुवात केली आहे. सध्या नाशिक तालुक्यातील दोन ते तीन गावांमध्ये अशा प्रकारचे होर्डींग दिसून येत असून यापुढे प्रत्येक गावात आम्ही होर्डींग उभारू, असा इशारा येथील सकल मराठा समाजा तर्फे दिला जात आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...