spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी : शरद पवार विरुद्ध उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत? पहाच...

मोठी बातमी : शरद पवार विरुद्ध उदयनराजे भोसलेंमध्ये थेट लढत? पहाच…

spot_img

सातारा / नगर सहयाद्री : सातारा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. याबाबत स्वतः सर्वेसर्वा शरद पवार यांनीच पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.

आता या मतदारसंघातून कोणला उमेदवारी द्यायची याबद्दल येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय घेऊ असं शरद पवारांनी जाहीर केलं आहे. सातारा मतदारसंघामधील राज्यसभेचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीतून चार ते पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर पुन्हा दाखल आपण निवडणूक लढवणारच असं जाहीर केलं आहे.

असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून स्वत: शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात अशी शक्यताही नाकारता येत नाही. तसे संकेत पवार यांनीच दिले आहेत. असं झालं तर साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शरद पवार अशी थेट लढाई पाहायला मिळू शकते.

साताऱ्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी साताऱ्यातील मतदारांनी कायमच राष्ट्रवादीवर प्रेम केल्याचं नमूद केलं. तसेच श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला असला तरी पक्षासाठी इतर सर्व कामं मी आवडीने करेन असं सांगितलं असल्याचीही माहिती शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिली. “यशवंतराव चव्हाणानंतर साताऱ्याचं कायचम राष्ट्रवादीवर प्रेम राहिलं आहे,” असं शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहितीही शरद पवारांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....