spot_img
अहमदनगरमला तुरुंगात टाकले तरी माझं कुटुंब कर्जतमधून लढेल, आ. रोहित पवारांच्या सूचक...

मला तुरुंगात टाकले तरी माझं कुटुंब कर्जतमधून लढेल, आ. रोहित पवारांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

spot_img

कर्जत / नगर सह्याद्री : सध्या अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजित पवारांकडे गेल्याने आता आगामी काळात नेमकं काय घडेल याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

दरम्यान आता शरद पवार गटाकडून कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात विजय निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात रोहित पवारांनी सूचक वक्तव्य केले. ‘ईडीने मला जेलमध्ये टाकले तरी माझ्या जागी माझं कुटुंब येथून लढेल’, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून रोहित पवारांची ईडीकडून चौकशी सुरु असून, याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मंगळवारी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आलेल्या निर्णयानंतर शरद पवार गटाचा पहिला मेळावा आज अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान याच मेळाव्यात बोलतांना रोहित पवार म्हणाले की, “काल घेतलेला निर्णय संविधानाच्या बाजूने नव्हता.

गेल्या काही वर्षांत संविधान बाजूला ठेवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. 2014 ते आतापर्यंत संविधानाला तडा आणण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. दबाव टाकून सर्वच खासदार जर भाजपने स्वतःच्या बाजूने केले, तर भविष्यात निवडणूका होतील की नाही याची शंका आहे. 2024 मध्ये भाजपची सत्ता आली तर पुढच्या निवडणूका लागतील याबाबत देखील शंका आहे. भाजपसोबत गेलेल्या नेत्यांना लोकसभेनंतर स्वतःच्या चिन्हावर नाही, तर भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल. तसेच जयंत पाटलांवर ईडीचा दबाव टाकला जातोय, पण ते लढत असल्याचे”, देखील रोहित पवार म्हणाले.

भाजपकडे पक्ष फोडण्याची ताकद असेल, तर धनगर, लिंगायत आणि इतर समाजाला 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण देण्याची धमक त्यांच्याकडे नाही का?, शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक, गुजरातमध्ये जात असलेल्या उद्योगांना थांबवण्याची धमक या भाजपमध्ये नाही का? , असे म्हणत रोहित पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तर, येत्या काळात पक्ष मजबूतीसाठी राज्यभर दौरा केला जाणार असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...