spot_img
महाराष्ट्रभीषण अपघात ! परीक्षेला चाललेल्या तीन भावा बहिणीला चिरडले

भीषण अपघात ! परीक्षेला चाललेल्या तीन भावा बहिणीला चिरडले

spot_img

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री
परीक्षेला चाललेल्या तीन भावंडांना ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर ही घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक बहीण व दोघे भावांचा समावेश होता.

प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे असून ते परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात ते मागील काही दिवसांपासून राहत होते.

प्राथमिक माहितीनुसार, आज (दि.८) सकाळी दहा वाजता बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरात हे तिघे चालले होते. याचवेळी दोन हायवा एकमेकांना ओव्हरटेक करत होत्या. याच नादात एका हायवा चालकाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने व थेट अंगावरून हायवा गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हायवा चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला.

मृत झालेले तिघेही बहीण-भाऊ साधारण वीस ते पंचवीस वर्षे असतील असा अंदाज आहे. घटनास्थळी वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट आढळून आल्याने ते परीक्षा देण्यासाठी जात होते असा अंदाज वर्तवला आहे. घटनेनंतर माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत गर्दी केली. माहिती समजताच चिकलठाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हायवा ट्रकचा शोध सुरु केला होता. घटनास्थळाची भयावह स्थिती पाहून नागरिकांमधून अत्यंत शोक व्यक्त केला जात होता. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून तपासाअंती अधिक माहिती समोर येईल.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...