spot_img
अहमदनगर'पूर्वी बाळासाहेब विखेंना खासदार केले, आता सुजय विखेंना खासदार करू'

‘पूर्वी बाळासाहेब विखेंना खासदार केले, आता सुजय विखेंना खासदार करू’

spot_img

मनसेची ग्वाही / संयुक्त प्रचारासाठी भाजप व मनसे समन्वय बैठक
अहमदनगर / नगर सह्याद्री :
भाजप शिवसेनेच्या जुन्या युतीमध्ये राज ठाकरेंनी काम केलेले असल्याने त्यांच्याशी जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबध आहेत. मनसे बरोबरचे जुने ऋणानुबंध पुन्हा जुळले गेल्याने आनंद झाला आहे. राज ठाकरे बरोबर आल्याने महायुतीची ताकद वाढली आहे. शहरात व जिल्ह्यात समन्वयाने काम करून भाजपचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांचे मताधिक्य वाढण्यासाठी मनसेचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केले. 

लोकसभा निवडणुकीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या पहिल्या समन्वय बैठकीत अॅड.अभय आगरकर बोलत होते. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा, महिला जिल्हाध्यक्षा अनिता दिघे, उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत, उपशहराध्यक्ष तुषार हिरवे, भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, सरचिटणीस प्रशांत मुथा आदींसह भाजपाचे व मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सचिन डफळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला आहे. त्यामुळे मनसेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे आदेशाचे पालन करून खा.सुजय विखेंना विजयी करतील. मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सळसळते रक्त असल्याने ते कोठेही कमी पडणार नाहीत. आमची प्रत्येक तालुक्यात ताकद आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्वाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करू. यापूर्वी बाळासाहेब विखेंना खासदार केले. आता त्यांच्या नातवालाही खासदार करू, अशी ग्वाही दिली.

यावेळी सुमित वर्मा, गजेंद्र राशिनकर, अनिता दिघे, नितीन म्हसे, विनोद काकडे, तुषार हिरवे आदींनी मनोगतातून विविध सूचना करत उमेदवार खा.विखेंना मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.

या बैठकीला मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना शहराध्यक्ष गणेश शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे, राहुरी तालुका तालुकाध्यक्ष मनोज जाधव, पारनेर तालुका उपजिल्हाध्यक्ष मारुती रोहोकले, माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पवार, श्रीगोंदा तालुका जिल्हा सचिव संजय शेळके, तालुकाध्यक्ष अतुल कोठारे, कर्जत तालुकाध्यक्ष जगधने, पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...