spot_img
अहमदनगरडॉ. जाधव महाराज यांचे कार्य आदर्शवत: पद्मश्री पवार

डॉ. जाधव महाराज यांचे कार्य आदर्शवत: पद्मश्री पवार

spot_img

कर्जुले हरेश्वर ग्रामस्थांच्या वतीने डॉ. नारायण महाराज जाधव यांचा वेदमंत्रोच्चारात नागरी सत्कार
पारनेर | नगर सह्याद्री
वारकरी संप्रदायाचा गाढा अभ्यास करताना श्रीक्षेत्र आळंदी येथे आपल्या नावाचं वेगळं वलय निर्माण करणं आणि हे करत असताना समाजात सातत्याने जागृती निर्माण करण्याचं काम ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव यांनी केले. राज्य शासनाने त्यांना दिलेला पुरस्कार हा खर्‍या अर्थाने त्यांनी केलेल्या कामाचा गौरव असून त्यांचे कार्य निश्चितपणे आदर्शवत असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक, वेदमुर्ती डॉ. ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव (बाबा) यांना राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा ज्ञानोबा- तुकोबा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. संत साहित्यातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार डॉ. जाधव बाबा यांना मिळाल्याबद्दल त्यांचा त्यांचे मुळ गाव असणार्‍या कर्जुले हरेश्वर ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून वेदमंत्रोच्चारात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.

श्री हरेश्वर मंदिरात झालेल्या या कार्यक्रमासाठी पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह पोळकाका पळशीकर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, सरपंच सौ. सुनीता मुळे, देवस्थान ट्रस्टचे सचिव एकनाथ दाते, उपाध्यक्ष दत्तात्रय आंधळे, सहसचिव बाळासाहेब उंडे, उपसरपंच मिनीनाथ शिर्के, माजी सरपंच साहेबराव वाफारे, संजीवनी आंधळे, शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव आंधळे, माजी प्राचार्य व्ही. जी. जाधव, समाजसेवक गणपत वाफारे, हरीशेठ कोकाटे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, वि. का. सेवा संस्थेचे उपाध्यक्ष नितीन आंधळे व सर्व संचालक मंडळ, हरेश्वर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ, अनुसया पतसंस्थेचे पदाधिकारी, हरेश्वर पतसंस्थेचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच कर्जुले हर्या गावचे नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोपटराव पवार यांनी रामराज्य व ग्रामराज्याची संकल्पना मांडताना नव्या पिढीसमोरची आव्हाने आणि कुटुंब व्यवस्था याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. देवस्थान ट्रस्टचे सचिव एकनाथ दाते यांनी प्रास्ताविक केले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी गावकर्‍यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभामागील भूमिका विषद केली. ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीकडून होत असलेल्या सत्काराबद्दल आदराची भावना व्यक्त करतानाच आपण फार मोठे काम केले असे मला वाटत नसल्याचे डॉ. जाधव म्हणाले.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान स्वयंभू श्री हरेश्वर मंदिरात पहाटे रुद्राभिषेक करण्यात आला. पहाटे चार वाजता आयोजित करण्यात आलेल्या या रुद्राभिषेकासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त सहभागी झाले होते. काकडा भजनानंतर ह. भ. प. बाळकृष्ण महाराज महामुनी यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली शिवलिलामृत ग्रंथाचे पारायण करण्यात आले. डॉ. नारायण महाराज जाधव बाबा यांचे यावेळी हरीकिर्तन झाले. कर्जुलेच्या सरपंच सुनीता मुळे यांच्या वतीने उपस्थित सर्वांना महाप्रसादाची खिचडी वाटप करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश आंधळे यांनी केले.

कर्जुले हरेश्वरचा आदर्शगाव योजनेत समावेश होणार-पवार
राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष असणार्‍या पोपटराव पवार यांच्या हस्ते डॉ. जाधव बाबा यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर या गावाचा समावेश राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेत करावा आणि हीच खर्‍या अर्थाने डॉ. बाबा यांना पोपटराव पवार यांची भेट असणार असल्याची भूमिका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी मांडली. त्यावर बोलताना पवार यांनी या योजनेत या गावाचा समावेश करण्यात येत असल्याचे याबाबत लागलीच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली जाईल असे जाहीर केले.

पुरस्कारामुळे जाधव बाबा नव्हे तर बाबांमुळे पुरस्कार मोठा झाला- शिर्के
पुरस्कार कोणताही असो, त्या पुरस्कारामुळे व्यक्तीची, संस्थेची ओळख निर्माण होते आणि त्यातून त्याचा समाजात नावलौकीक वाढत असतो. त्यातून ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व याची चर्चा होत असते. राज्य शासनाचा ज्ञानोबा- तुकोबा हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर डॉ. जाधव महाराज यांचे मोठेपण सिद्ध झाले असे म्हणता येणार नाही. खरेतर या पुरस्कारामुळे जाधव बाबा मोठे झाले नसून जाधव बाबांमुळे हा पुरस्कार मोठा झाला असल्याचे प्रतिपादन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांचा पाऊस पाडला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...