spot_img
देशरजनीकांतच्या पत्नीविरोधात गुन्हा ! करोडोंची फसवणूक?

रजनीकांतच्या पत्नीविरोधात गुन्हा ! करोडोंची फसवणूक?

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सुपरस्टार रजनीकांत हे कुणाला माहिती नसतील असा व्यक्ती सापडणे मुश्किल. आता त्यांच्या पत्नीवर फसवणुकीचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रजनीकांत यांच्या पत्नी लता यांच्याविरुद्ध याबाबत एफआयआरही दाखल करण्यात आलाय.

हे प्रकरण रजनीकांत यांचा ‘कोचादियान’ सिनेमावेळचं आहे. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत लता रजनीकांत म्हणाल्या,’माझ्यासाठी ही खूपच अपमानाची गोष्ट आहे. सेलिब्रिटी असण्याची आम्हाला किंमत चुकवावी लागत आहे. जेव्हा तुम्ही लोकप्रिय असता तेव्हा प्रकरण भलेही छोटं का असेना त्याला मोठंच बनवलं जातं. कोणतीही फसवणूक झालेली नाही आणि माझं या पैशांशी काहीच देणंघेणं नाही.’

काय आहे हे प्रकरण?
तक्रारदाराने केलेल्या आरोपानुसार, फिल्मच्या निर्मांत्यांपैकी कोणा एकाने पोस्ट प्रोडक्शनसाठी १० कोटी रुपये लावले होते. यावर लता यांची सही देखील होती. मात्र लता यांच्या प्रोडक्शन कंपनीकडून त्याला पैसेच मिळाले नाहीत. याप्रकरणी 2022 मध्ये कर्नाटक न्यायालयाने लता यांना दिलासा दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण पुन्हा उघडण्यास सांगितलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....