spot_img
देशBreaking News : देशभरात एम.फील डिग्रीचे शिक्षण होणार कायमचे बंद ! पहा...

Breaking News : देशभरात एम.फील डिग्रीचे शिक्षण होणार कायमचे बंद ! पहा सर्वात मोठा निर्णय

spot_img

नवी दिल्ली / नगर सहयाद्री : शिक्षणे क्षेत्रातून एक मोठी बातमी आली आहे. यूजीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयीन एम. फील डिग्री कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार आता देशभरातील सर्व महाविद्यालयांना एम. फील डिग्रीचं अ‍ॅडमिशन न देण्याचे आदेश दिले गेले आहेत. यूजीसीकडून याबाबतचा आदेश आजच पारित करण्यात आला असून आता पुढच्या शैक्षणिक वर्षापासून एम. फील डिग्रीसाठी अ‍ॅडमिशन अधिकृतपणे बंद केले जाणार आहे.

यूजीसीने याबाबत नोटीस जारी केली आहे. एम. फील मान्यताप्राप्त डिग्री नाही, असं युसीजीने स्पष्ट केलं आहे. एम. फील म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी डिग्री ही दोन वर्षांची पोस्टग्रॅज्युएट अ‍ॅकेडमिक रिसर्च प्रोग्राम होतं, जे पीएचडीसाठी प्रोव्हिजन इनरोलमेंटसारखं काम करतं. पण आता युजीसीने डिग्रीची मान्यता रद्द केल्याने आता विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी अ‍ॅडमिशन घेता येणार नाही.

यूजीसीने आता असं म्हटलं आहे की, काही महाविद्यालयातून एम.फीलच्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित करत आहेत. पण महाविद्यालयांनी तसं करु नये. कारण ही डिग्री मान्यता प्राप्त नाही. सण 2020 मध्येच या डिग्रीला डिस्कन्टीन्यू करण्याची शिफारस केली गेली होती. आजपासून या डिग्रीला स्पष्टपणे नोटीस काढून अमान्य करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच ही डिग्री बंद करण्यात आली आहे. महाविद्यालय अनुदान आयोग विनियम, 2022 तयार केला आहे, ज्याला 7 नोव्हेंबर 2022 ला भारताच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आलं आहे, असं यूजीसीने नोटीसमध्ये म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम पारनेर...

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा...

…म्हणुन दोन गटांत राडा; ‘असा’ घडला नको तोच प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी...