मुंबई। नगर सहयाद्री
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनाची लागण झाल्यास पाच दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे. या संदर्भात लवकरच नियमावली जारी करण्यात येणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ८६२ साली आहे. मागील दहा दिवसांत कोरोना रुग्ण संख्येचा आलेख चढता राहिला आहे.
त्यामुळे गृहविलगीकरणाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच वयस्कर व्यक्तींसाठी मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांनी लोकांच्या संपर्कात न येण्याचा सल्ला देण्यात आला.
कोरोनाची रुग्ण संख्या देशभरात वाढत आहे. जेएन१ रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थांना सतर्क करण्यात आले असून तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.
परदेशातून येणार्या लोकांनाही काही दिवस गृहविलगीकरणात राहण्यास सांगण्यात येण्याची शयता आहे. विषाणूचा प्रचार होऊ नये यासाठी टास्क फोर्सकडून काळजी घेतली जात आहे.