अहमदनगर। नगर सहयाद्री-
नागरदेवळे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (दि. २) रात्री घडली. यात एका गटाचे दोघे आणि दुसर्या गटाचा एक असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटाच्या १३ ते १४ जणांवर भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या मारहाणीतील जखमी उजेर लियाकत शेख, उमेर लियाकत शेख (दोघे रा. नागरदेवळे) यांच्यावर खासगी रुग्णालयात तर संतोष यादव शेलार यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. शबाना लियाकत शेख यांच्या फिर्यादीवरून अभिजीत धाडगे, पुष्कर शेलार, उदय शेलार व ७ ते ८ अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद जखमी संतोष यादव यांच्या फिर्यादीवरून उजेर लियाकत शेख, उमेर शेख व दोन अनोळखी व्यक्तीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.