spot_img
ब्रेकिंगफॉर्म्यूला ठरला!! ‘मविआ’ आघाडीमध्ये काँग्रेसला मिळणार 'इतक्या' जागा?

फॉर्म्यूला ठरला!! ‘मविआ’ आघाडीमध्ये काँग्रेसला मिळणार ‘इतक्या’ जागा?

spot_img

पुणे। नगर सहयाद्री
आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दौरे, सभा, जागा वाटप चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरवला असल्याची माहिती समोर आली आहे. मविआने जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरवला असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

पुण्यातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी उपस्थित होते. पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार असून, त्याबाबत कोणतेही मतभेद नाहीत. मेरिटच्या आधारे सूत्र निश्चित केले केले असून, लवकरच ते जाहीर केले जाईल.

भाजप विरोधात लढणार्‍यांना सोबत घेण्यास काँग्रेस सकारात्मक आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली शरद पवार, उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची दिल्लीत चर्चा होईल. दरम्यान, महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागांचे वाटप करण्यासाठी फॉर्म्युला दिल्लीत ठरल्याचे सुत्रांकडून समजते. या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळण्याची शयता आहे.

शिवसेना ठाकरे गटाला १७ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाला ६ जागा आणि वंचित बहुजन आघाडी २ जागा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळणार असल्याची माहिती आहे.

जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाटाघाटीची सुरुवात २२ ते २३ जागांपासून होऊ शकते. मात्र, चर्चेअंती दोन्ही पक्ष किमान तीन जागांवर पाणी सोडण्यास तयार असल्याची माहिती आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Rain Update: पुढील ४८ तासांत मुसळधार! महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट

मुंबई। नगर सहयाद्री- जानेवारी ते मार्च या हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शयता भारतीय...

आजचे राशी भविष्य ! तुमच्या राशींसाठी कसा आहे ‘शनिवार’?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि...

GST वरून अजित पवारांना सुनावलं, आ. थोरांतांनी थेट हॉटेलंचं बिलच सांगितलं

मुंबई / नगर सह्याद्री : राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत अर्थसंकल्पातील भांडवली...

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत गडकरी आहेत का? स्वतः नितीन गडकरी यांनी दिल ‘हे’ बिनधास्त उत्तर

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : नितीन गडकरी यांना सातत्याने पंतप्रधान पदासाठी अत्यंत...