spot_img
अहमदनगरAhmednagar: काँग्रेसची मनपात प्रति महासभा! पाच वर्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांचा वाचला पाढा..

Ahmednagar: काँग्रेसची मनपात प्रति महासभा! पाच वर्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांचा वाचला पाढा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री-

चालू पंचवार्षिक कालावधीसाठीची मनपाची शेवटची महासभा बुधवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपात थेट प्रति महासभा भरवली. यावेळी मागील पाच वर्षांमध्ये झालेल्या विविध घोटाळ्यांवर हल्लाबोल करण्यात आला. पाच वर्ष घोटाळ्यांचे, नगरकरांच्या वाटोळ्याचे, अशी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी प्रति महासभा गाजवत मनपा दणाणून सोडली.

त्यामुळे प्रत्यक्ष महासभा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नगरसेवकांची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळाली. यानंतर काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त आणि काळे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.

यावेळी काळे यांच्यासह दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, गणेश आपरे, अलतमश जरीवाला, सुनीता भाकरे, जरीना पठाण, मिनाज सय्यद, विकास भिंगारदिवे, सुनील क्षेत्रे, गणेश चव्हाण, रियाज सय्यद, इंजिनीयर सुजित क्षेत्रे, सोफियान रंगरेज, विनोद दिवटे, गौरव घोरपडे, शंकर आव्हाड, किशोर कोतकर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रति महासभेत कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकवून महासभेचा निषेध केला. शहरातील सुमारे ४० हजार दुकानदार, व्यापारी यांच्याशी निगडित असणार्‍या जाचक व्यवसाय परवाना शुल्क वसुलीचा विषय महासभेच्या अजेंडावर चर्चेसाठी सुद्धा नमूद करण्यात आलेला नाही.

त्याचाही निषेध यावेळी किरण काळे यांनी केला. दुकानदार व्यापार्‍यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांच्यावर गदा आणणारा निर्णय महासभेने मंजूर केला होता. त्याला व्यापार्‍यांनी तीव्र विरोध करून देखील या निर्णयाला मागे घेण्यासंदर्भात तत्परता महासभा अजेंड्यावर दाखवण्यात आली नाही. याचे उत्तर दुकानदार, व्यापार्‍यांनी येत्या सार्वत्रिक मनपा निवडणुकीत अशांना द्यावे असे आवाहन यावेळी काळे यांनी केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी व्यापार्‍यांवर अन्याय करणार्‍या मनपाचा निषेध, भ्रष्टाचाराचा निषेध, स्मशानभूमी खरेदी घोटाळा, पथदिवे घोटाळा, भूखंड वाटप घोटाळा, रस्ते घोटाळा, श्वान निर्बीजीकरण घोटाळा घोटाळा यांच्या निषेदांच्या फलकांसह घोटाळेबाज मनपाचा निषेध, नगरकरांच्या तोंडाला पाने पुसणार्‍या महासभेचा निषेध असे फलक झळकवले.
श्वान निर्बीजीकरण आणि पथदिवे यांच्या कामावरून देखील काळेंनी यावेळी हल्लाबोल केला.

आयुक्त – काळे यांच्यामध्ये खडाजंगी

रस्ते घोटाळा प्रकरणांमध्ये पोलिस कारवाईसाठी आवश्यक असणारी मूळ बनावट कागदपत्र सादर करण्याचे लएखी पत्र शासकीयतंत्र निकेतन मागणी करून मागील पाच महिने वीस दिवस उलटून गेले. तरी देखील मनपा दोषींना पाठीशी घालत आहे. या मुद्द्यावरून काळे यांनी आयुक्त यांना चांगले धारेवर धरले. यावेळी आयुक्त यांनी काही प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. यावर काळे चांगलेच संतापले. मात्र आयुक्त यांनी काळे यांचा चढलेला पारा पाहता उपायुक्त कुरे, शहर अभियंता मनोज पारखे यांना पाचरण केले काळे यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी लवकरात लवकर कारवाई पूर्ण करू असे म्हणत मनपा अधिकार्‍यांनी सारवा सारव केल्याचा दावा शहर काँग्रेसने केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Rain Update: पुढील ४८ तासांत मुसळधार! महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट

मुंबई। नगर सहयाद्री- जानेवारी ते मार्च या हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शयता भारतीय...

आजचे राशी भविष्य ! तुमच्या राशींसाठी कसा आहे ‘शनिवार’?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि...

GST वरून अजित पवारांना सुनावलं, आ. थोरांतांनी थेट हॉटेलंचं बिलच सांगितलं

मुंबई / नगर सह्याद्री : राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत अर्थसंकल्पातील भांडवली...

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत गडकरी आहेत का? स्वतः नितीन गडकरी यांनी दिल ‘हे’ बिनधास्त उत्तर

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : नितीन गडकरी यांना सातत्याने पंतप्रधान पदासाठी अत्यंत...