spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसची 'महालक्ष्मी' योजना महिन्याला २ हजार देणार? काँग्रेसच्या जाहिरनाम्यात काय-काय? वाचा सविस्तर..

काँग्रेसची ‘महालक्ष्मी’ योजना महिन्याला २ हजार देणार? काँग्रेसच्या जाहिरनाम्यात काय-काय? वाचा सविस्तर..

spot_img

Politics News: महाराष्ट्रमध्ये कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रे अॅक्शन मोडवर आलेय. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना आज दिल्लीत बोलवण्यात आलेय. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीमध्ये जाहीरनामा, जागावाटपावर चर्चा होणार असल्याचे समजतेय. काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठा आपला जाहीरनामा तयार केलाय. त्यामध्ये महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला उत्तर देण्यात येणार असल्याचे दिसत आहे.

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात काय असणार?
महाराष्ट्रासाठी महालक्ष्मी योजना
या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रति महिना दोन हजार रुपये मिळणार आहे.

कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजना
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं ३ लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे. ही कर्जमाफी साधारण २८ हजार कोटीची असणार

महालक्ष्मी योजना
महिलांना प्रति महिना २००० रूपये दिले जाणार आहेत. यासाठी ६० हजार कोटीचा निधी अपेक्षित आहेत.

स्री सन्मान योजना
या योजनेअंतर्गत महिलांना बस वाहतूक सेवा पुर्णपणे मोफत दिली जाणार आहे. या योजनेसाठी १ हजार ४६० कोटीचा निधी अपेक्षित आहे.

कुटुंब रक्षण
सर्वांना २५ लाख रूपयांचं विमा कवच देण्यात येणार आहे. या योजनेसाठी ६ हजार ५५६ कोटीचा निधी अपेक्षित

युवकांना शब्द
बेरोजगारांना महिन्याला ४ हजार रूपये दिले जातील. साधारण ६.५ लाख युवकांना हा भत्ता दिला जाणार

समतेची हमी
दलित, अल्पसंख्याकांसाठी विशेष योजना राबवल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत साधारण ८.५ कोटी लोकांना फायदा होईल, असा दावा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...