spot_img
ब्रेकिंगमंत्रालयात हालचालींना वेग! विधानसभेच्या तोंडावर मुंबई 'टोलमुक्त'

मंत्रालयात हालचालींना वेग! विधानसभेच्या तोंडावर मुंबई ‘टोलमुक्त’

spot_img
मुंबई | नगर सह्याद्री:-
विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकाने निर्णयांचा सपाटा चालवला आहे. आचारसंहिता लागण्याआधी झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे. आणखी एका महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय पुणे मेट्रो रेल टप्पा-2 संदर्भातही मोठा निर्णय घेतलाय.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय
मुंबईतल्या 5 प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ 12 पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम), आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय),  समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर डव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण), दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा), आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा), वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग), राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल), पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल), खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल), राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) 2.0 राबविणार, पुणे मेट्रो रेल टप्पा-2 मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास), किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार), अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार), मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची 3 पदे (वैद्यकीय शिक्षण), खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण), मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा), अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट, उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास), कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास), दमण गंगा आणि गोदावरी नदी जोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
आचारसंहिता केव्हा…
संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागणार याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहेत.  दरम्यान, आचारसंहिता कधीपासून लागू होईल यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. येत्या दोन दिवसाच्या आत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. मंगळवारी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...