spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसकडून २८८ जागा लढण्याची तयारी, पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ...

काँग्रेसकडून २८८ जागा लढण्याची तयारी, पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ…

spot_img

भंडारा:नगर सह्याद्री

लोकसभा निवडणुका संपताच राज्यात आता सर्वच पक्षांन विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. येत्या काहीच महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, लोकसभेत आपण सारे भाऊ-भाऊ म्हणणारे नेते आता वेगवेगळी विधानं करताना दिसत आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने २८८ जागेवर लढण्याची तयारी सुरु केली असल्याचं सूचक वक्तव्य पटोलेंनी केलं आहे.

महाराष्ट्रात सगळीकडे विधानसभेची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या २८८ जागांवर काँग्रेसने तयारी सुरु केली आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभेत काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने एकत्र येत निवडणूक लढवली. या निवडणुकीत सर्वाधिक खासदार हे काँग्रेसचे निवडणूक आले. तर राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे ४८ पैकी ३० खासदार जिंकले. त्यामुळे येत्या विधानसभेतही महाविकास आघाडी एकत्र लढेल अशी शक्यता होती. पण, आता महाविकास आघाडीतील नेते वेगवेगळी विधानं करताना दिसून येत असल्याने विधानसभेचा सस्पेन्स वाढत चालला आहे.

तर, तिकडे महविकास आघाडीतीलच उद्धव ठाकरेंची शिवसेनाही विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विधानसभा मतदारसंघानुसार उमेदवारांचं स्क्रिनिंग सुरु केलं आहे. तसेच, ठाकरेंनी सर्व संपर्क प्रमुखांकडून त्यांच्या त्यांच्या विभागातील अहवालही मागवला आहे. ठाकरेंकडून सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....