spot_img
अहमदनगरआ. सत्यजित तांबे यांची 'पुस्तक तुला'

आ. सत्यजित तांबे यांची ‘पुस्तक तुला’

spot_img

शेवगाव : आमदार सत्यजित तांबे यांची शेवगावमध्ये ‘पुस्तक तुला’ करण्यात आली. शेवगावचे नगरसेवक रिंकू कलके आणि ग्रामस्थांनी मंगळवारी हा सन्मान केला. विविध व्यासपीठांवरून तरुणाईला शिक्षणाचं आणि वाचनाचं महत्व पटवून देणाऱ्या आ. तांबे यांच्या कारकि‍र्दीत एक अनोखा सन्मान त्यांना प्राप्त झाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

आमदार सत्यजित तांबे शेवगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राजीव राजळे मित्रमंडळ आयोजित ‘राजीव बुक फेस्ट २०२३’ या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी शेवगावचे नगरसेवक रिंकु कलके आणि ग्रामस्थांनी आमदार सत्यजीत तांबे यांची ‘पुस्तक तुला’ केली.

या पुस्तक तुलेसाठी वापरलेली पुस्तके विविध संस्थां आणि गरजू विद्यार्थ्यांना दान करण्यात येतील. या वेळी आमदार तांबे यांना ‘ज्ञान उपासना सन्मान’ प्रदान करण्यात आला.

यावेळी आ. सत्यजित तांबे म्हणाले की, पुस्तक हे माणसाचे आयुष्य घडवते. त्यामुळे वाचन संस्कृती जपली पाहिजे असं ते म्हणाले. तर वाचन संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याच काम आ. सत्यजीत तांबे करत असल्याची भावना कलके यांनी व्यक्त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...