spot_img
राजकारणमुंडे बंधू-भगिनी व फडणवीस प्रथमच एकाच मंचावर येणार? भाजपच्या पोस्टरवरही पंकजांना स्थान,...

मुंडे बंधू-भगिनी व फडणवीस प्रथमच एकाच मंचावर येणार? भाजपच्या पोस्टरवरही पंकजांना स्थान, राजकीय गणिते जुळतायेत?

spot_img

नगर सह्याद्री / बीड

बीडमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मंत्री धनंजय मुंडे व भाजपनेत्या पंकजा मुंडे एकाच मंचावर येतील. परळीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि स्थानिक आमदार परळीत येणार आहेत.

 प्रथमच देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एका व्यासपीठावर
शासन आपल्यादारी कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. तर देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर पाहायला मिळतील. त्यामुळे या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असेल. तर भाजपच्या पोस्टर्सवरही पंकजा मुंडे यांचे फोटो दिसत आहे.

आज जर पंकजा मुंडे या कार्यक्रमाला हजर राहिल्या तर मुंडे बंधू-भगिनी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही छुपा संघर्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. आज जर पंकजा मुंडे या कार्यक्रमात हजर राहिल्या तर भाजपचे हे दोन बडे नेतेदेखील एका मंचावर दिसण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...