spot_img
अहमदनगरपाणीप्रश्न पेटला, राजकारणही तापणार ! गडाखांच्या 'या' मागणीने विखे-थोरातांची झोप उडणार

पाणीप्रश्न पेटला, राजकारणही तापणार ! गडाखांच्या ‘या’ मागणीने विखे-थोरातांची झोप उडणार

spot_img

नगर सह्याद्री / नेवासे : समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडीत पाणी सोडण्याचे नियोजन सुरु आहे. त्यानुसार मुळा व भंडारदरा धरणातील पाणी जायकवाडीत सोडण्यात येणार आहे. परंतु नगरमध्येच आधीच दुष्काळ स्थिती असताना हा निर्णय येथील शेतकऱ्यांना त्रासदायक जाणार आहे.

आता यावरून दक्षिण – उत्तर मधील राजकीय नेत्यांमध्येच राजकारण तापेल असे चित्र दिसत आहे. याचे कारण म्हणजे समन्यायी पाणीवाटप धोरणाच्या पार्श्वभूमीवर घोडेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी मोठी मागणी केली आहे.

शंकरराव गडाखांनी काय केली मागणी?
निळवंडे धरणाचे डावे, उजवे कालवे अद्याप पूर्ण नाही. पाणी साठवून ठेवण्यापेक्षा ते पाणी समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडीत सोडावे, अशी जाहीर भूमिका आमदार शंकरराव गडाख यांनी मांडली. त्यामुळे आता त्यांच्या या मागणीने उत्तरेतील जायकवाडी पाणीप्रश्नावरून एकमेकांसोबत भांडणाऱ्या नेत्यांमध्ये खळबळ उडेल हे नक्की. उत्तरेतील दिग्गज नेते आ.बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, काळे, कोल्हे, मुरकुटे यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे पाहणे गरजेचे आहे.

समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार भंडारदरा धरणातून 3 टीएमसी आणि मुळा धरणातून 2 टीएमसी असे एकूण पाच टीएमसी पाणी सध्या जायकवाडीसाठी सोडले जाणार आहे. या अनुषंगाने पाटबंधारे विभागाकडून कार्यवाही सुरू केल्याने नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. यात राजकीय नेते आता एकमेकांवर आरोप करतानाच आ. गडाखांनी रास्ता रोको करत नवी मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विखेंनी विरोध केल्यास शांत बसणार नाही
आमदार गडाखांच्या या मागणीने चर्चा सुरु झाली आहे. गडाख यावेळी बोलताना म्हणाले, आपली मागणी जरी असली तरी उत्तरेतील नेते असे होऊ देणार नाहीत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे विरोध करतील, असे गडाख म्हणाले. त्यांनी तसे करू नये, मात्र तसे केल्यास आम्हीही शांत बसणार नसल्याचा इशारा गडाख यांनी या वेळी दिला आहे.

जायकवाडीसाठी वेगळा न्याय का?
समन्यायी पाणी वाटप कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आला. सोलापुरातील धरण कोरडे पडले आहे. पुण्यातील धरणे भरली असली तरी पुणे धरणातून पाणी सोडण्याचे धाडस अधिकाऱ्यांमध्ये नाही. मात्र, नगर-नाशिकमधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची तयारी प्रशासनाकडून दाखविली जात आहे. मग हा असा वेगळा न्याय का ?असाही सवाल गडाखांनी यावेळी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या जातकांना मिळणार गोड बातमी

मुंबई नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे...

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...

बापरे! महापालिकेत ६० कोटींचा भ्रष्टाचार? ‘कोणी आणि का केली मागणी?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या...