spot_img
राजकारणमोठी बातमी - मंत्रिमंडळ बैठकीत भुजबळांसह मंत्र्यांना समज, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केले 'असे' काही

मोठी बातमी – मंत्रिमंडळ बैठकीत भुजबळांसह मंत्र्यांना समज, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केले ‘असे’ काही

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांचे उपोषण मागे घेण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवरही भुजबळ यांनी टीका केली. त्यांच्या टीकेला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले होते.या सर्व घटनांचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत देखील उमटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण द्या, पण स्वतंत्र आरक्षण द्या. त्यांना ओबीसींच्या वाट्यातील आरक्षण देऊ नका, अशी ठाम भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. त्यानंतर या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व मंत्र्यांनी सामंजस्याची भूमिका घेणं जरुरीचं आहे, असं एकमत या कॅबिनेट बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वसामान्यांमध्ये सरकारची भूमिका विश्वासार्ह दिसली पाहिजे, अशी भावना सहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांचे कान टोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंत्र्यांना काय दिल्या आहेत सूचना ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज राज्य मंत्रिमंडळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. यावर सर्व मंत्र्यांनी आपली मते मांडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दोन्ही समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. बोलताना सावधगिरी बाळगा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आरक्षणाबाबत सामंजस्याची भूमिका घेण्यास सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...