spot_img
देशमोठी बातमी : प्रसिद्ध अभिनेत्रीवर जमावाकडून दगडफेक

मोठी बातमी : प्रसिद्ध अभिनेत्रीवर जमावाकडून दगडफेक

spot_img

औरंगाबाद / नगर सह्याद्री : सेलिब्रिटींवर हल्ला झालेल्या काही घटना याआधीही घडलेल्या आहेत. परंतु आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे.

पोलिसांनी अभिनेत्रीला यातून वाचवलं आहे. अभिनेत्रीवर हा हल्ला तिच्याच चाहत्यांनी केला आहे. ही प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह आहे. तिच्यावर दगडफेक झाली आहे. अक्षरा बुधवार,17 जानेवारी रोजी दुपारी एका शोरूमच्या उद्घाटनासाठी दाउदनगर याठिकाणी पोहोचणार होती.

पण धुक्यामुळे अभिनेत्रीचे विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही. दुपारी कार्यक्रमासाठी पोहोचणारी अक्षरा संध्याकाळी पोहोचली. अशात अभिनेत्रीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. अशाच लोकांना नियंत्रित करणे कठीण झाले.

याचदरम्यान काही चाहते जखमी देखील झाले. हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या लोकांनी अक्षरा सिंगवर हल्ला केला. त्यांनी दगडफेक सुरू केली. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी अक्षराला घेरलं आणि तिला सुखरूप वाचवले.

अक्षरा हिला वाचवताना एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी झालेल्या पोलिसांची प्रकृती आता स्थिर आहे. अक्षरा भोजपुरी अभिनेत्री असली तरी, भारतात तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रियसीला संपवलं; रेड लाईट परिसरात प्रियकराच भयंकर कृत्य!

मुंबई । नगर सहयाद्री चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या...

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

मुंबई । नगर । सहयाद्री:- देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज...

कोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता, केडगाव परिसरातील रोशन कुमार...

मुला-मुलींच्या संपत्तीवर आई-वडिलांचा हक्क असतो का?, कायदा काय सांगतो!

नगर सहयाद्री वेब टीम:- भारतात मालमत्तेवरून होणारे वाद काही नवीन नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये संपत्तीवरून...