spot_img
देशकोचिंग क्लासेसच्या कारभारावर लगाम!! १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी? नियम मोडल्यास 'इतका'...

कोचिंग क्लासेसच्या कारभारावर लगाम!! १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी? नियम मोडल्यास ‘इतका’ दंड

spot_img

नगर सहयाद्री टीम-
कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभारावर लगाम लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून काही नव्या स्वरूपाचे बंधने देखील घातले आहे. त्यानुसार १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही.

१६ वर्षांच्या वयाच्या मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही. त्याशिवाय कोचिंग सेंटर चालवणारे विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करता येणार नाही. नियमावलीतील व्याख्येनुसार ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल

नीट अथवा जीईई ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. त्याशिवाय खासगी कोचिंग क्लासमध्ये मनमानी फी आकारली जाते. त्यामुळे या सर्वांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. आयआयटी जेईई, एमबीबीएस, नीट यासारख्या प्रोफेशनल कोर्साठी कोचिंग सेंटरमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक ‘करण्यात आले असून ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल.

नियम मोडल्यास  दंड

कोचिंग क्लासेसने नियम मोडल्यास आर्थिक दंडाचा सामना करावा लागणार आहे. कोचिंग सेंटरकडून नियमांचे एकदा उल्लंघन झाल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. जर पुन्हा नियमांचं उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यानंतरही नियम पाळले गेले नाहीत तर कोचिंग क्लासेसची मान्यता रद्द होऊ शकते.

१० दिवसांमध्ये फी माघारी

नव्या नियमांनुसार, एखाद्या कोर्सदरम्यान कोचिंग सेंटरला फी वाढवता येणार नाही. जर एखाद्या विद्याथ्यनि पूर्ण पैसे भरूनही कोर्स अर्धवट सोडण्यासाठी अर्ज केला, तर कोर्सच्या उर्वरित कालावधीचे पैसे परत करावे लागतील. हॉस्टल आणि मेस फी देखील परताव्यात समाविष्ट केली जाईल. दहा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना रक्कम माघारी करावी लागेल.

पाच तासांपेक्षा जास्त क्लास नाही

शाळा, कॉलेज अथवा एखाद्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेत कोणत्याही परिस्थितीत कोचिंग क्लासेस घेण्यात येणार नाहीत. त्याशिवाय एका दिवसांत पाच तासांपेक्षा जास्त क्लास चालणार नाही. सकाळी लवकर आणि रात्री उशिरा क्लासेस घेता येणार नाहीत. विद्यार्थी आणि शिक्षकांना साप्ताहिक सुट्टी द्यावी लागेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...