spot_img
देशशाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नदीत बुडाली, 14 मृत्यू

शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नदीत बुडाली, 14 मृत्यू

spot_img

गुजरात / नगर सह्याद्री : शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नदीत बुडाल्याची मोठी घटना घडली आहे. यात 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षक असा 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुजरातमध्ये घडली आहे.

या बोटीमध्ये खासगी शाळेचे एकूण 27 विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांनी कोणतेही लाईफ जॅकेट परिधान केलेले नसल्याचे समोर आले आहे. बोट उलटल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटद्वारे सहवेदना व्यक्त केली आहे.

वडोदऱ्याच्या हरणी जिल्ह्यात बोट पलटून मुले बुडाल्याची घटना घडली आहे. ही अत्यंत हृदय विदारक घटना आहे. प्राण गेलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करत आहे. या दु:खद प्रसंगी मी त्यांच्या परिवाराच्याप्रति सहवेदना व्यक्त करत आहे.

ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो, असे मुख्यमंत्री म्हणाले. घटनास्थळी बोटीत बसलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या बचावाचे कार्य सुरु आहे. तसेच जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी नेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...