spot_img
देशमोठी बातमी : 'या' तारखेपासून आचार संहिता ! लोकसभा निवडणुकांचा वाजणार बिगुल

मोठी बातमी : ‘या’ तारखेपासून आचार संहिता ! लोकसभा निवडणुकांचा वाजणार बिगुल

spot_img

नवी दिल्ली | नगर सह्याद्री : बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) वाजणार आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत २०२४ च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी होणार आहे. निवडणुकांच्या घोषणांपाठोपाठ देशभरात आचारसंहिता लागू होईल. निवडणुकीच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांचे डोळे लागून राहिले आहेत.

शनिवार १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. अपवादानेच शनिवार-रविवारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित करते. मात्र यावेळी आधीच घोषणांना दिरंगाई झाल्यामुळे आयोगाने शनिवारचा दिवस निवडल्याचे दिसते. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

देशभरातील निवडणुका किती टप्प्यात पार पडणार, कुठल्या राज्यात कधी मतदान होणार, कुठल्या दिवशी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून पान २ वर

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...