spot_img
महाराष्ट्रतुमचा एकही खासदार निवडून येऊ देणार नाही ! मनोज जरांगे यांनी देवेंद्र...

तुमचा एकही खासदार निवडून येऊ देणार नाही ! मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला ‘हा’ इशारा

spot_img

बीड / नगर सह्याद्री : मराठा समाजासाठी आंदोलन करतोय म्हणून मला बदनाम केलं जातंय. माझे बनावट व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. पण मी देवेंद्र फडणवीसांना इतकंच सांगतो. भलेही तुम्ही मला बदनाम करा, पण कट रचून मराठा समाजापासून मला तोडण्याचा प्रयत्न केलात, तर तुमचा ४८ पैकी एकही खासदार लोकसभेत निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील वडवणी येथे गुरुवारी (ता. १४) मराठा समाजाची संवाद बैठक घेतली. या बैठकीला हजारो मराठा बांधव उपस्थित होते. बैठकीत बोलताना मनोज जरांगे यांनी आरक्षणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर टीकेचा भडीमार केला. भाजपचे लोक माझ्याविषयी बनावट व्हिडीओ तयार करत असून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. मी मराठा समाजापासून लांब गेलो पाहिजे असा कट रचण्यात आला आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे की मनोज जरांगे पाटलांनी घाबरु नये.

मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाहीर सांगतो, की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून करणार आहात. पण मला जे करायचं ते मी करणारच आहे. तुम्ही कुठलेही व्हिडीओ आणा, कसलेही रेकॉर्डिंग आणा मी आरक्षण घेणार म्हणजे घेणारच. वेळ पडली तर समाजासाठी वेगळं आंदोलन करेन, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. आपल्या विरोधात मराठा समाजाचा इमानदार पोरगा लढतोय, याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे होतं. तर तुम्हाला खरे राजकारणी म्हटलं गेलं असतं.

पण देवेंद्र फडणवीसांची वृत्ती नीच आहे. मी तुम्हाला वडवणीतून आव्हान देतो आहे. तुम्ही मला भलेही बदनाम करा. पण समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केलात, तर तुमचा ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही, असा इशाराच जरांगेंनी फडणवीसांना दिलाय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...