spot_img
अहमदनगरराज्याच्या राजकारणात पारनेरकरांचा कायम पाठिंबा ! शरद पवार का झाले भावनिक ?...

राज्याच्या राजकारणात पारनेरकरांचा कायम पाठिंबा ! शरद पवार का झाले भावनिक ? पहा..

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात पारनेर तालुक्यातील लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून मला व माझ्या विचारांना कायम पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक वेळा लोकप्रतिनिधी सुद्धा निवडून देण्याचे काम जनतेने केले. एक सामान्य कुटुंबातील व प्रामाणिकपणे कष्ट करणारा आमदार नीलेश लंके असून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आ. लंकेने केला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणार्‍यांशी आमची साथ असल्याचे सूचक वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुण्यामध्ये केले.

आमदार नीलेश लंके यांच्या मी अनुभवलेला कोव्हिड पुस्तकाचे शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. आमदार लंके हे गुरूवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या विविध माध्यमे तसेच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असताना प्रत्यक्षात गुरूवारी दुपारी पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करीत केवळ आ. लंके यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. पुस्तक प्रकाशनाप्रसंगी शरद पवार म्हणाले, संपूर्ण विश्व कोरोनाच्या संकटात असताना नीलेश लंके यांनी संकटातील माणसाला अधार देण्याचे काम केले. ३० हजार रूग्णांना उपचार देणे ही साधी गोष्ट नाही. ३० हजार रूग्णांच्या डोळयातील अश्रू पुसणे ही आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असून तो मोठा ठेवा आहे. लंके यांनी ज्या पध्दतीने सेवा केली त्यापैकी १० टक्के सेवा जरी इतर लोकप्रतिनिधींनी केली असती तर देशात वेगळे चित्र पहावयाय मिळाले असते.

स्वातंत्र्याच्या चळवळीत नगर जिल्हयाचे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर पुरोगामी चळवळीत पारनेरकांचे योगदान महत्वपुर्ण होते. पारनेर हा दुष्काळी तालुका. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, हाताला काम हे प्रश्न असल्याने हजारो नागरीक काम धंद्यासाठी मुंबईत वास्तव्यास आहेत. या समस्या दूर करण्यासाठी आ. लंके यांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, अंकुश काकडे, प्रशांत जगताप दादा कळमकर, अशोक बाबर, शिवशंकर राजळे, बाबासाहेब भिटे, प्रताप ढाकणे, गहिनीनाथ शिरसाठ, रोहिदास कर्डीले, बाळासाहेब हराळ, संदीप वर्पे, महेबुब शेख, जगन्नाथ शेवाळे, अभिषेक कळमकर यांच्यासह नगर दक्षिण मतदार संघातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, जयंत पाटील यांनी आपल्या भाषणानंतर त्यांना मी माझी आवडती वस्तू भेट देणार आहे असे सांगत लंके यांना तुतारीची प्रतिमा भेट दिली. लंके यांनीही ती स्विकारली. त्यानंतर उपस्थितांनी टाळया वाजवून स्वागत केले.

कॉमन मॅन डोन्ट अंडरइस्टिमेट ः खा. अमोल कोल्हे
नीलेश लंके हे शरद पवार यांच्यासोबत गेले तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, लंके हे पारनेरपुरते लोकप्रिय आहेत. अशी टीका अजित पवार यांनी केली होती. या टिकेस प्रत्युतर देताना खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, मोठया नेत्याने केले तर ती राजकीय महत्वाकांक्षा तर सामान्य माणसाने केले तर तो मोह असतो का असा सवाल करीत डोन्ट अंडरइस्टिमेट कॉमन मॅन हा चित्रपटातील डायलॉग सांगत कोल्हे यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.

इथे लोक मतही देतात आणि पैसेही!
राज्यातील पारनेर हा एकच मतदारसंघ असा आहे की जिथे लोक मतेही देतात आणि पैसाही देतात. निवडणूक लढविणे ही मोठया खर्चाची बाब असते. लंके यांचे मात्र उलटे आहे. जमा होणारा पैसा लंके हे लोकांच्या कल्याणासाठी वाटतात. पैसा वाटल्याने त्यात आणखी वाढ होत असल्याचे पवार म्हणाले.

लंके महाराष्ट्राला भुरळ घालणारे नेतृत्व ः जयंत पाटील
आमदार नीलेश लंके हे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व असून सर्वसामान्य जनतेमध्ये आपलं नेता माझा नेता ही भावना रुजली आहे. संकटकाळात धावून येणारा नेता म्हणजे आमदार लंके असून त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्राला भुरळ घालणारे नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. कोरोना संकटात कोव्हीड सेंटर सुरू करून आतमध्ये जाउन काम करणारा एकच बहाद्दर निघाला. त्यांचे काम पाहून संपूर्ण नगर जिल्हा त्यांना डोयावर घेण्यासाठी उत्सुक आहे. माझा, हक्काचा, आपला माणूस अशी भावना त्यांच्या कामाने निर्माण झाली असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

..म्हणून पवार यांच्या हस्ते प्रकाशन
शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर या नावाने आपण कोव्हीड सेंटर सुरू केले होते. कोरोना संकटात काम करताना पवार साहेबांची अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी उभी होती. त्यांच्याच हस्ते हस्ते मी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे असा माझा हट्ट होता. कालही मी पवार साहेबांच्या विचारधारेबरोबर होता. आजही आहे. देशाचे कृषी मंत्री असताना शेती, शेतकर्‍यांसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजवर कोणीही घेतले नाहीत. औद्योगिक वसाहतीचे ते जनक आहेत. सुप्याच्या एमआयडीसीची पायाभरणीही त्यांनीच केली आहे. तेथील उद्योग आज बहरत आहेत. -आ. नीलेश लंके

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....