अहमदनगर । नगर सहयाद्री
अचानक उष्णता वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतातील मालावर व फळबागावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. मागच्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी वारा व वादळ झाल्यानंतर दोन-तीन दिवस हवेत अल्हादायक गारवा निर्माण झाला होता त्यामुळे नागरिक सुखावले होते मात्र मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे अचानक उष्णता वाढली आहे.
तापमान वाढल्यामुळे प्रचंड उकाडा वाढला आहे. संपूर्ण आभाळ भरल्यामुळे केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. असंतुलित हवामानामुळे भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आंबा बागायतदारही हवालदील झाला आहे. दिवसा व रात्री हवेत उष्णता जाणवत आहे तर दिवसभर नागरिक घामांच्या धारांमध्ये भिजून निघत आहे.
परिणामी नागरिक उखाड्याने हैराण झाले असून आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक ताप, सर्दी, खोकला आधी आजारांपासून त्रस्त आहेत . श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक तापमानातील बदलामुळे व तसेच अधून मधून हवामानात बदल होत असल्यामुळे गेली काही दिवस खाजगी दवाखान्यात, ग्रामीण रुग्णालयात सर्दी, ताप, खोकला, यासारख्या आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे.
आरोग्याची काळजी घ्या
उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होत असल्याने बहुतांश नागरिकांना थकवा जाणवत आहेत तर काहींना उष्णतेमुळे डोकेदुखीचा त्रास होत आहे .शारीरिक थकव्यामुळे पायाला गोळे येत आहेत .जेवण कमी होते .काही खाऊ वाटत नाही त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करावा दुपारचा प्रवास टाळावा. पाणी जास्त प्रमाणात प्यावे यामुळे उष्णतेपासून पासून बचाव होऊन शारीरिक व्याधींपासून सुरक्षा होऊ शकते.