spot_img
अहमदनगरअरे बाबा, संसद म्हणजे ग्रामपंचायत नाही! अन तुम्ही बंद पाडण्याची भाषा करता?...

अरे बाबा, संसद म्हणजे ग्रामपंचायत नाही! अन तुम्ही बंद पाडण्याची भाषा करता? भाजपच्या नेत्यांनी घेतला लंके यांचा समाचार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
सध्या लोकसभेच्या निवडणुकीत अहमदनगर (अहिल्यानगर) लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचा उमेदवार निवडणूक लढवित आहे. या पक्षाने संपूर्ण देशभरात केवळ १० उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी किती निवडून येतील हे त्यांचे त्यांनाच माहीत. पण त्यांचा उमेदवार मात्र त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा समोरच संसद बंद पाडण्याची भाषा करतो, हा एक विनोदच म्हणावा लागेल, कुणीतरी त्यांना सांगावे लागेल अरे बाबा,संसद म्हणजे काही ग्रामपंचायत नाही. आले मनात कि पाडली संसद बंद. असे तिथे चालत नाही. संसद बंद पाडण्यासाठी खासदारांची आवश्यक संख्या लागते, अशा खरपूस शब्दात भाजपाचे नेते विनायक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या उमेदवाराचा समाचार घेतला.

माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी आज नगर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवाजीराव कर्डिले, दिलीप भालसिंग, अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, मी १९९२ च्या लोकसभा निवडणुकीपासून या प्रक्रियेत सहभागी आहे. पण मागील ३२ वर्षात या निवडणुकीत प्रचाराचा स्तर अत्यंत खालावलेला असून थापा मारण्याची स्पर्धा सुरू झाली आहे की काय ?, असे वाटते. काही उमेदवारांना तर “संसद म्हणजे ग्रामपंचायत” आहे की काय असे वाटू लागले आहे. गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर थापा मारणे एक वेळ समजू शकते. परंतु लोकसभेच्या २५ लाख मतदारांना थापा मारणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.

लोकसभेची निवडणूक सुरू झाली आणि एका उमेदवाराने जाहीर केले की “माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार आहेत.मला काँग्रेसचा ३५ वर्षाचा अनुभव असल्यामुळे या बातमीचे मला जरा आश्चर्यच वाटले. पण असेही वाटले की कदाचित त्या उमेदवाराची राहुल गांधी बरोबर मैत्री असु शकते. त्यामुळे राहुल गांधी कदाचित येतील सुद्धा !!. त्यानंतर काही दिवसांनी त्याच उमेदवाराचे वक्तव्य आले की “वाहतुकीला त्रास होईल म्हणून मीच राहुल गांधींना येऊ नका असे म्हटले. मागील ३०-३५ वर्षाच्या राजकारणात नगरच्या जनतेला एवढा बालिशपणा प्रथमच अनुभवायला मिळाला.

या पुढील काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचा) उमेदवार अजूनही मोठमोठ्या थापा मारण्याची शक्यता आहे. मात्र जनतेने त्यांना स्पष्टपणे विचारायला हवे कि “आपण संपुर्ण देशात केवळ दहाच जागा लढवता?. मग तुमच्या या थापा कशा खऱ्या होतील ?. तुमच्या पेक्षा महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि एम.आय.एम. हे पक्ष जास्त जागा लढवीत आहेत. मग तुम्ही दिलेली आश्वासने कशी काय पूर्ण करणार.

मतदारांनी अशा भुलथापांना बळी न पडता आपल्याला “ग्रामपंचायतीचा सरपंच निवडायचं नसून देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे,” याचे भान ठेवावे आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी कमळा समोरील बटन दाबुन खा.डाॅ. सुजय विखे पा. यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन विनायक देशमुख यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...