spot_img
अहमदनगरपद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा दुरदृष्टीचा विचार विकासासाठी आधारभूत ठरेल :...

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा दुरदृष्टीचा विचार विकासासाठी आधारभूत ठरेल : पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
सहकार चळवळीच्या माध्‍यमातून समाजाला एकसंघ ठेवतानाच या चळवळीचा उपयोग ग्रामीण भागाच्‍या उत्‍कर्षा करीता त्‍यांनी दिलेला संदेश पुढे घेवून जाण्‍याचे काम येणा-या पिढीला करावे लागेल. पद्मश्रींच्‍या दुरदृष्टीचा विचार हा विकासासाठी आधारभूत ठरेल असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या ४४ व्‍या पुण्‍यतिथी निमित्‍ताने मंत्री विखे पाटील यांनी डॉ.विखे पाटील फौंडेशनच्‍या प्रागणात असलेल्‍या पद्मश्री विखे पाटील यांच्‍या पुतळ्यास पुष्‍पहार अर्पण करुन, अभिवादन केले. याप्रसंगी फौंडेशनच्‍या विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्‍यापक उपस्थित होते.

सहकार चळवळीचे बिज रोवून पद्मश्रींनी समाजातील नाहीरे वर्गाला ख-याअर्थाने आधार निर्माण करुन दिला. सहकार चळवळ ही शेतक-यांच्‍या असली तरी या चळवळीने ग्रामीण भागाच्‍या परिवर्तनात निर्माण केलेले स्‍थान खुप महत्‍वपूर्ण आहे. सहकारातून निर्माण झालेली शिक्षण व्‍यसथा ही ग्रामीण भागातील मुलांच्‍या उत्‍कर्षासाठी महत्‍वपूर्ण ठरली. इंग्रजी माध्‍यमांचे शिक्षण सुरु झाल्‍यामुळेच आज लाखो विद्यार्थी या शैक्षणिक संकुलातून देशाच्‍या कानाकाप-यात आपले यश सिध्‍द करुन दाखवित आहेत. हीच सहकार चळवळीची यशस्‍वीता असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.

सहकार चळवळीपुढे अनेकांनी आव्‍हानं निर्माण करण्‍याचे प्रयत्‍न केले. पण लोकांच्‍या विश्‍वासामुळे ही चळवळ कोणीही मोडू शकले नाही. उलट या सहकार चळवळीचा आलेख उंचावत गेला. आज देशात सहकार मंत्रालय स्‍थापन होणे ही मोठी उपलब्‍धी सहकार चळवळीसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या स‍ंकल्‍पनेतून सुरु झालेले सहकार मंत्रालय केंद्रीय मंत्री अमित शाह नेतृत्‍वाखाली गतीने पुढे जात आहे.

सहकार मंत्रालयाच्‍या माध्‍यमातून होत असलेल्‍या निर्णयांचा लाभ गावातील प्राथमिक सोसायट्यांपासून ते सहकारी बॅंकींग आणि कारखानदारीपर्यंत सर्वच सहकारी संस्‍थान होत असल्‍याचे त्‍यांनी नमुद केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...