spot_img
अहमदनगरनगरसेवक संग्राम शेळके यांची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

नगरसेवक संग्राम शेळके यांची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक संग्राम शेळके यांनी नगर तालुका प्रमुख पदी असतांना तालुक्यातील विद्यार्थी, शेतकर्‍यांसह विविध घटकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी संग्राम शेळके यांची उपजिल्हाप्रमुख, नगर शहरपदी नियुक्ती केली आहे.

याबाबतचे पत्र नुकतेच देण्यात आले.गेल्या दीड वर्षापूर्वी नगर तालुका शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदी संग्राम शेळके यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे त्यांची हिंदह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पदोन्नती करण्यात आली आहे.

त्यांची शिवसेनेच्या उपजिल्हापमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास शेळके यांना दिलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेरमध्ये गुंडगिरी, शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार; आमदार तांबे काय म्हणाले पहा

बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार सत्यजित तांबे | शहराची विस्कटलेली...

वाळू तस्करांची दहशत संपुष्टात!; पोलिसांनी काय केले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुयात सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवून बेकायदेशीर वाळू तस्करी करणारे तसेच...

पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले; अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतून...

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

आयुक्त यशवंत डांगे | २७ नोव्हेंबरपर्यंत हरकतींसाठी मुदत अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक...