spot_img
राजकारणजे अजित दादांना कळलं ते तुम्हाला कळलच नाही..! जयंत पाटलांचा फडणवीस-शिंदेंना टोला..पहा..

जे अजित दादांना कळलं ते तुम्हाला कळलच नाही..! जयंत पाटलांचा फडणवीस-शिंदेंना टोला..पहा..

spot_img

नगर सह्याद्री / नागपूर : राज्य विधिमंडळाच सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, कांदा निर्यातबंदीचा निर्णय, उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी आदींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकरी प्रश्नावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परराज्यात गेले होते. यावरून त्यांनी निशाणा साधला.

काय म्हणाले जयंत पाटील?
गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाला होता. त्यावेळी सत्ताधारी शेजारच्या राज्याच्या निवडणुकीत प्रचारात व्यस्त होते. इतर राज्यांत प्रचार करण्यास आमची हरकत नाही पण इथं आपला संसार फाटला असताना दुसऱ्या राज्यात संसार जोडण्यासाठी मंत्री जातायेत हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने बरं नाही असे ते म्हणाले आहेत.

तुमचा तिकडं विजय झाला, याचा आम्हाला आनंद आहे. पण तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक इमेज असल्यामुळे तुम्हाला जाण्याची आवश्यकता नव्हती. तुम्हाला कोण विचारतो तिकडं?” असा खरपूस सवाल जयंत पाटील यांनी करत ते म्हणाले की, आपले मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री प्रचारासाठी तिकडे गेले पण दुसरे उपमुख्यमंत्री गेले नाहीत असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

त्यांनी असं म्हणताच अजित पवारांनी उत्तर दिलं की मी तिकडे जाऊन काय दिवे लावणार होतो? जे आहे ते मोदींच्या नावावर आहे असं ते म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढत जयंत पाटील म्हणाले की, “मी पण तेच म्हणतोय…जे दादांना कळलं ते तुम्हाला कळलं नाही.” असा खोचक सवाल त्यांनी लगावला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...