spot_img
अहमदनगरParner News: चंपाषष्ठीत सप्ताहाची मागणी फेटाळली! धर्मदाय उपायुक्तांनी दिले 'हे' आदेश

Parner News: चंपाषष्ठीत सप्ताहाची मागणी फेटाळली! धर्मदाय उपायुक्तांनी दिले ‘हे’ आदेश

spot_img

पारनेर।नगर सहयाद्री-
तालुयातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या चंपाषष्ठी महोत्सवात अखंड हरिनाम सप्ताह ही पूर्वापार चालत आलेली परंपरा नसून १२ वर्षापासून चालू केलेली आहे. त्यामुळे यासंबंधी विश्वस्तांच्या बैठकीत बहुमताने ठराव झाला असतानाही देवस्थानचे माजी अध्यक्ष पांडुरंग गायकवाड व माजी उपाध्यक्ष रामदास मुळे यांनी नगरच्या धर्मदाय उपायुक्तांकडे या संदर्भात केलेली मागणी धर्मदाय उपायुक्त यु. एस. पाटील यांनी फेटाळून लावली आहे.

अ‍ॅड पांडुरंग गायकवाड व रामदास मुळे यांनी ९ डिसेंबर ते १६ डिसेंबर या चंपाषष्टीच्या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करावा, अशी मागणी करणारा लेखी अर्ज व प्रतिज्ञापत्र नगरच्या धर्मदाय उपायुक्तांकडे ३ नोव्हेंबरला दाखल केले होते. या अर्जात इतरही काही मुद्यांवर प्रामुख्याने प्रकाश टाकत चंपाषष्ठी काळात अखंड हरिनाम सप्ताह घेण्याची मागणी केली होती. त्यावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. चंपाषष्ठीच्या काळात अखंड हरिनाम सप्ताह साजरा न केल्याने देवस्थानचे काही नुकसान होणार नसून केवळ आपल्याला देवस्थानचा अध्यक्ष न केल्याने सध्याच्या अध्यक्षांसह विश्वस्त मंडळाला मानसिक त्रास देण्याचा हेतू प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

19 नोव्हेंबरच्या कोरठण खंडोबा देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत विश्वस्तांना नोटीस बजावून व बैठकीमध्ये चर्चा होऊन वार्षिक यात्रोत्सवाच्या दरम्यान हा अखंड हरिनाम सप्ताह करण्याचे ठराव झाला आहे. असे असताना माजी अध्यक्ष व माजी उपाध्यक्षांना चंपाषष्ठीतच अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्याचा आग्रह व मागणी बेकायदेशीर असल्याचेही धर्मादाय उपायुक्त यांनी आदेशात म्हटले आहे. मागणी फेटाळल्यामुळे आता वार्षिक यात्रोत्सवात अखंड हरिनाम सप्ताह होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष सौ शालिनी अशोक घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे व ज्येष्ठ विश्वस्त राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गँगस्टर छोटा राजनचा साथीदारस बेड्या; ‘असा’ अडकला जाळ्यात

मुंबई ।नगर सहयाद्री:- गँगस्टर छोटा राजनचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड डीके रावला अटक करण्यात...

श्रीरामपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे; तीन महिन्यात तीन गोळीबार!

श्रीरामपुर । नगर सहयाद्री:- निवृत्ती नंतर सुखी, सुरक्षित राहण्यासाठी नावलौकिक असलेल्या श्रीरामपूर शहरात काय...

सैफवरील हल्ला संशयास्पद! मंत्री नितेश राणेंची शंका; अजितदादा काय म्हणाले?

पुणे नगर सहयाद्री:- अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ल्या झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती....

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ३१ जानेवारीपर्यंत ‘हे’ काम करा; अन्यथा लाभ मिळणार नाही?

PM Kisan Yojana: केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...