spot_img
ब्रेकिंगRain Updates: चिंता वाढली! 'मिचॉन्ग' चक्रीवादळ धडकणार,'या' जिल्ह्यात पुन्हा मुसळधार

Rain Updates: चिंता वाढली! ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ धडकणार,’या’ जिल्ह्यात पुन्हा मुसळधार

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यान चक्रीवादळ तयार होत असून मध्यप्रदेश व महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शयता वर्तवण्यात आली आहे. २ डिसेंबरते हे ३ डिसेंबरच्या दरम्यान चक्रीवादळ तयार होईल. या दरम्यान राज्यात पावसाची दाट शक्यता असून हवामान खात्याने काही जिल्ह्याना यलो अलर्ट दिला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान खात्याने राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. तसेच जळगाव, नाशिक तसेच मराठवाड्यातील जालना व छत्रपती संभाजीनगर येथे मेघगर्जनेसह पावसाची शयता वर्तवली आहे. विदर्भात रविवार ते मंगळवारपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली.

‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा धोका

आयएमडीने च्या माहितीनुसार २ डिसेंबर आणि पुढे ३ डिसेंबरच्या सुमारास ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा धोका आहे. चक्रीवादळ दक्षिण दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे, 2 डिसेंबरपर्यंत ती खोल दाबामध्ये तीव्र होईल आणि 3 डिसेंबरच्या सुमारास नैऋत्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळात बदलेल. हे संभाव्य वादळ देशाच्या दक्षिण भागात हे किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणाचा GR फाडला, OBC नेते आक्रमक, आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर...

संयमाने परिस्थिती हाताळत, अभूतपूर्व पेचातून मार्ग काढत कसोटीस उतरलेले संयमी नेतृत्व विखे पाटील खरेखुरे वास्तववादी संकटमोचक!

सारिपाट / शिवाजी शिर्के काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील उपोषणात गिरीष...

मावा अड्ड्यावर छापा; एलसीबीची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत मावा अड्डयावर छापा...

जादा परताव्याचे आमिष; १.६० कोटींची फसवणूक, १५ आरोपी, पोलिसांनी केले असे…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये इनफिनाईट बिकन इंडिया प्रा. लि. आणि ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि....