spot_img
अहमदनगरAhmednagar:अबब!.. हा तर विश्वासघातच, ‘फोन पे’ व्दारे लुबाडले एवढे

Ahmednagar:अबब!.. हा तर विश्वासघातच, ‘फोन पे’ व्दारे लुबाडले एवढे

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
वकिलाच्या मोबाईलचा वापर करून त्यांच्या मावस भावाने दोन लाख एक हजार रूपये फोन पे व्दारे काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार २९ डिसेंबर २०२३ ते ३ जानेवारी २०२४ च्या दरम्यान मुकुंदनगर परिसरात व जिल्हा न्यायालयासमोर घडला आहे.

या प्रकरणी मुकुंदनगर परिसरातील वकिलाने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आला आहे. अमान सादिक शेख (रा. मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी व अमान हे दोघे मावस भाऊ आहेत.

अमान याने २९ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलचा वापर करून त्यांच्या फोन पे नंबर वरून स्वतःच्या फोन पे नंबरवर विश्वासघात करून दोन लाख एक हजार रूपयांची रक्कम पाठवली. हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमान शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

GST वरून अजित पवारांना सुनावलं, आ. थोरांतांनी थेट हॉटेलंचं बिलच सांगितलं

मुंबई / नगर सह्याद्री : राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत अर्थसंकल्पातील भांडवली...

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत गडकरी आहेत का? स्वतः नितीन गडकरी यांनी दिल ‘हे’ बिनधास्त उत्तर

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : नितीन गडकरी यांना सातत्याने पंतप्रधान पदासाठी अत्यंत...

..म्हणून विवाहितेचा छळ! सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर। नगर सह्याद्री- मुलगी झाली म्हणून व आई-वडिलांकडून पाच लाख रूपये घेऊन येण्यासाठी विवाहितेचा सासरच्यांनी...

जलजीवनचे काम बंद!! ‘यांची’ कार्यपद्धती संशयास्पद? पिंपळनेर, गटेवाडी ग्रामस्थांनी दिला ‘असा’ इशारा

पारनेर | नगर सह्याद्री| पारनेर तालुयातील पिंपळनेर व गटेवाडी गावातील जलजीवन मिशन योजनेचे काम अत्यंत...