spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : पाच वेळा आमदार राहिलेल्या 'या' नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ...

Ahmednagar Politics : पाच वेळा आमदार राहिलेल्या ‘या’ नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली ! मोठा धक्का

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणूक आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रभर दौरे सुरु केले आहे. ते सध्या अहमदनगर जिल्ह्यात आहेत. परंतु त्यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील एका बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बडे नेते बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी शिवसेना पक्षाकडून पाच वेळा आमदारकी भूषवली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर उबाठा शिवसेना गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

खरे तर आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बबनराव घोलप यांना निवडणूक लढवायची होती. त्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली होती. मात्र शिवसेना ठाकरे गटात अचानक माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांची इंट्री झाली. वाघचौरे यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर बबनराव घोलप कमालीचे नाराज होते. घोलप यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठींपुढे मांडली होती. दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले असल्याचे बोलले जात होते.

पण, उद्धव ठाकरे यांच्या नगर दौऱ्याच्या वेळी घोलप यांनी हजेरी लावली नाही. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणे महत्त्वाचे समजले. मुंबईत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या समवेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

दरम्यान याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसारमाध्यमांना मी उबाठा शिवसेना पक्षाला राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले होते. यानुसार त्यांनी आता उबाठा शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. याप्रसंगी बोलताना बबनराव घोलप यांनी “आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मी निष्ठेने काम केले आहे.

मला पक्षाने जे जे सांगितलं, ते प्रामाणिकपणे केलं आहे” असं म्हटल आहे. तसेच “अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरुन मला काढून अपमानित करण्यात आलं. मी जे निष्क्रीय पदाधिकारी काढले होते, नवीन पदाधीकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले हे कितपत योग्य आहे” असा सवाल उपस्थित केला असून उबाठा शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा मी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरमध्ये खळबळ! मतपेट्या आणलेल्या बसमध्ये सापडले नोटांचे बंडल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी...

उमेदवारांची धाकधूक वाढली! नगरमध्ये कुणाच्या अंगावर पडणार गुलाल…

विधानसभेच्या परिक्षेचा शनिवारी निकाल | समर्थकांकडून गुलालाची तयारी | चौकाचौकात दावे प्रतिदावे अहिल्यानगर | नगर...

भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात; संगमनेरमध्ये झळकले फ्लेक्स

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून आता वेध लागलेत ते निकालाचे....

शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; कुठे घडली घटना

छत्रपती संभाजीनगर । नगर सहयाद्री:- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील एका 31 वषय महिलेवर...