spot_img
अहमदनगर'भ्रष्ट कारभाराविरोधात अ‍ॅड. बोरुडे यांचे आमरण उपोषण'

‘भ्रष्ट कारभाराविरोधात अ‍ॅड. बोरुडे यांचे आमरण उपोषण’

spot_img

श्रीगोंदा। नगर सहयाद्री
भ्रष्टाचारा विरोधात कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसाठी अ‍ॅड. सुमित बोरुडे यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. अनोख्या मागणीसाठी वकील तरुणांनी सुरू केलेल्या या उपोषणाची शहरात चांगलीच चर्चा होत आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्यासह पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये चाललेल्या भ्रष्टाचार बाबत वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही होत नाही. भ्रष्टाचारात एक सूत्रता रहावी व नागरिकांनी पोलिसांना द्यावी लागणारी भ्रष्टाचाराची नेमकी रक्कम समजणे सहज शक्य व्हावे यासाठी एक दरपत्रक लावावे.

श्रीगोंदा पोलीस स्टेशन कायद्याचे रक्षण करण्याऐवजी भक्षण करत आहे. तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट चालू आहे. पोलीस स्टेशनच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली केली असून कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; वादग्रस्त मोहोळ विरुद्ध राक्षे लढतीची चौकशी होणार

योगेश दोडके यांची माहिती / प्रा.विलास कथुरे यांची प्रमुखपदी नियुक्ती अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरमध्ये...

तब्बल १९ बोगस कंपन्यांमधून कोट्यवधी लुटले; मोबाईल चालू तरी पोलिसांना सापडेना संदीप अन् त्याची टोळी…

 पोलीस अधिकार्‍यांच्या भूमिकाच संशयास्पद स्पेशल रिपोर्ट / शिवाजी शिर्के - सह्याद्री मल्टीनिधी ही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत...

शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय; शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच करावा लागेल अभिषेक!

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एक मार्च २०२५ पासून...

‘सुपा, पारनेर, बेलवंडीत दरोडा टाकणारे जेरबंद’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- सुपा, पारनेर, बेलवंडीत परिसरात घरफोडी करणारे अट्टल दरोडेखोरांना, स्थानिक गुन्हे...