spot_img
अहमदनगरAhmednagar News : गोवंशाची कत्तल सुरु होती, पोलीस तितक्यात पोहोचले..'इतके' गोमांस जप्त

Ahmednagar News : गोवंशाची कत्तल सुरु होती, पोलीस तितक्यात पोहोचले..’इतके’ गोमांस जप्त

spot_img

अहमदनगर/नगर सह्याद्री : नगर शहरातून गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. रिजवान मुस्ताक शेख (वय २४, रा. झेंडीगेट) यास ताब्यात घेतले असून तौसिफ मुस्ताक कुरेशी (रा. हमालवाडा, झेंडीगेट) असे फरार आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी आरोपीकडून १ लाख २०० रुपयांचा ५०० किलो गोमांस व सुरा असा मुद्देमाल जप्त केला. अधिक माहिती अशी : पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेशित केले होते.

त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/संतोष लोढे, पोकॉ/रविंद्र घुंगासे, सागर ससाणे यांचे पथक नेमले होते. या पथकास १७ डिसेंबर २०२३ रोजी गुप्त बातमीदारामार्फत बाबा बंगाली मस्जिदजवळ गोवंशीय  जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून कत्तल करत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी घटनास्थळी जात कारवाई केली. यावेळी रिजवान मुस्ताक शेख याला ताब्यात घेतले. तौसिफ मुस्ताक कुरेशी फरार झाला. आरोपी रिजवान मुस्ताक शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...