spot_img
अहमदनगरAhmednagar News : पारनेरमध्ये भाजप प्रबळ होणार ! मंत्री राधाकृष्ण विखे म्हणतात..

Ahmednagar News : पारनेरमध्ये भाजप प्रबळ होणार ! मंत्री राधाकृष्ण विखे म्हणतात..

spot_img

निघोज / नगर सह्याद्री : राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांनी निघोज पंचायत समिती गणात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. पक्षाने एक कार्यक्षम नेतृत्व म्हणून पारनेर तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे.

या पदाच्या माध्यमातून युवकांचे संघटन करत ते भाजपा पक्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही   महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. मंत्री  विखे पाटील यांच्या हस्ते पारनेर तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सुखदेव पवार, दत्ता पवार आदी उपस्थित होते.

विखे पाटील यांनी यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचेही कौतुक केले. शिंदे  यांनी तालुका अध्यक्ष पदाच्या माध्यमातून चांगले संघटन केले असून पंकज कारखिले, दत्ता  पवार आदी असंख्य युवकांची साथ त्यांना मिळणार असल्याने पारनेर तालुक्यात भाजप एक प्रबळ पक्ष म्हणून नावारूपाला येईल असे ते म्हणाले.  पंकज कारखिले यावेळी म्हणाले विखे पाटील तसेच खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात होईल. आगामी लोकसभा निवडणुकीत खा. सुजय विखे पाटील यांना पारनेर तालुक्यातील जनता विक्रमी मताधिक्य देईल अशी ग्वाही कारखिले यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...