spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : डाळ साखरेपेक्षा विकासकामे जनतेला फायदेशीर : आ.लंके यांनी साधला...

Ahmednagar Politics : डाळ साखरेपेक्षा विकासकामे जनतेला फायदेशीर : आ.लंके यांनी साधला निशाणा…

spot_img

निघोज / नगर सह्याद्री : आजपर्यंत पारनेरमधील जनतेसाठी १ हजार ७०० कोटी रुपयांची विकासकामे दिली. निघोजसाठी सर्वाधिक ७० कोटी ११ लाखांची विकासकामे दिली. डाळ साखर वाटप करण्यापेक्षा जनतेसाठी विकासकामे नक्कीच फायदेशीर असतात अशी टिप्पणी खा.सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळत आ.नीलेश लंके यांनी केली.

मंगळवार (दि.३०) सायंकाळी सात वाजता निघोज परिसरातील २० कोटी ५१ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आ. नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी मंळगंगा मंदीरासमोर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद या सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष शांताराम लंके, मंळगंगा कंट्रक्शनचे अध्यक्ष अमृता रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, बाळासाहेब लंके, वसंत कवाद, नामदेवराव थोरात, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, सचिव शांताराम कळसकर, सहसचिव रामदास वरखडे, बाळासाहेब लामखडे, मंगेश लंके, शिवाजीराव वराळ, शंकरराव लामखडे, बबनराव ससाणे, विश्वास शेटे, चंद्रकांत लामखडे, अशोकराव सावंत, सुदाम पवार, दीपक   लंके, जितेश सरडे, बापू शिर्के, अनिल गंधाक्ते, संदीप चौधरी, खंडू भुकन, प्रा.ज्ञानेश्वर कवाद, चंद्रकांत लंके, दत्तात्रय गुंड, रामदास लंके, रोहिदास लामखडे, सुनील वराळ, शांताराम लाळगे, वसंत ढवण, अध्यक्ष शिवाजीराव लंके, दिलीप ढवण, भाऊसाहेब लामखडे, विष्णू लोखंडे, सतीश साळवे, बाबा वाघमारे, अनिल लंके, ठकाराम लंके, दिगंबर लाळगे, गणेश कवाद, भावना साळवे, सुधामती कवाद, अनिल लामखडे, कुशाभाऊ कवाद, हिरभाऊ कवाद, दत्ता लंके, सचिन लंके, पांडुरंग लंके, किसनराव लंके, आबाजी लंके, बाबाजी लंके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. लंके म्हणाले, ज्या लोकांना काल परवा डाळ व साखर वाटप करताना डोक्यावर घेऊन नाचत होते त्यांनी तुम्हाला काय विकासकामे दिली आहेत याचे जनतेने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. गर्दी नाही म्हणून शाळेची पोरं उभी करून गर्दी जमा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. आपण जे बोलतो तेच करतो आणी जे करतो तेच आपण बोलतो असे ते म्हणाले.

रांजणखळगे, निघोज पिंपरी जलसेन रस्ता तसेच शाळा खोल्या, जलसिंचन बंधारे यासाठी २० कोटी ५१ लाख रुपयांचा निधी खर्च होणार असून आजपर्यंत निघोज परिसरासाठी ७० कोटी ११ लाख रुपयांची विकासकामांचा विचार करता साडेअकरा हजार मतदानाचा विचार केला तर प्रत्येक मतदाराला ६१ हजार रुपये विकासकामांसाठी खर्च केले आहेत असे ते म्हणाले.

बाजार समितीचे उपसभापती बापू शिर्के यांनी डाळ व साखर वाटपाचा समाचार घेतला. आमदार लंके यांनी गेली साडेचार वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून निघोजच्या जनतेने लंके  यांच्यावर मनापासून प्रेम केले. त्यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. निघोज जिल्हा परिषद गट आमदार लंके यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील याची खात्री दिली.

मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद यांनी आमदार नीलेश लंके यांनी आजपर्यंत   सर्वाधिक निधी निघोज परिसरासाठी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.  यावेळी विविध संस्था, सामाजिक मंडळे तसेच मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट तसेच निघोज ग्रामस्थ यांच्या वतीने आमदार लंके यांचा सत्कार प्रभाकर कवाद, शांताराम लंके, ज्ञानदेव लंके, सोमनाथ वरखडे यांच्या हस्ते करण्यात आला.

अभ्यासिका उभी राहिली पण ताबा मिळेना !
शरदचंद्रजी पवार साहेब अभ्यासिकेसाठी आ. लंके यांनी सव्वा कोटी रुपयांचा निधी दिला. ही इमारत पूर्ण होऊन वर्ष झाले. मात्र याचा ताबा ग्रामपंचायतकडेच आहे. ग्रामपंचायतने मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टकडे ही इअमृत देण्याची सूचना लंके यांनी केली. तसेच ट्रस्टकडे ताबा आल्यास  पंचवीस लाख रुपयांचे फर्निचर उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून...

विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल ; काय म्हणाले पहा…

संगमनेर / नगर सह्याद्री अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

मुंबई / नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं...