अहमदनगर / नगर सह्याद्री : अल्पवयीन मुलीला व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामद्वारे मॅसेज करून त्रास देणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. हा आरोपी भिंगार वेस येथे बसलेला असताना कोतवाली पोलिसांनी सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले.
सर्फराज बाबा शेख (वय २३ वर्षे, रा. आलमगिर, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या (मूळ राहणार बुलढाणा) आईने ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी फिर्याद दिली होती. आरोपीने मुलीच्या मोबाईलवर मेसेज करून त्रास दिला होता. तसेच जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली होती. कोतवाली पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी हा भिंगार येथे वेशीमध्ये बसलेला असल्याची माहिती कोतवाली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला सापळा लावून ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस करत आहेत.
छेड काढतय ? थेट 7777924603 या नंबरवर तक्रार करा
महिलांना कुणी त्रास देत असेल तर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार करावी अथवा थेट कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना 7777924603 यावर मेसेज करून तक्रार द्यावी. तक्रारदार महिलेचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.