spot_img
आर्थिकप्रेरणादायी ! 'तिने' छतावर फुलवली 'या' फुलांची बाग ! केली हजारो रुपयांची...

प्रेरणादायी ! ‘तिने’ छतावर फुलवली ‘या’ फुलांची बाग ! केली हजारो रुपयांची कमाई

spot_img

नगर सह्याद्री टीम : जेव्हा कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला होता तेव्हा अनेक लोकांचे जॉब गेले अनेकांचे व्यवसाय बुडाले. परंतु त्याच दरम्यान मंगळुरू येथील एक महिला वकील तिच्या गच्चीवर चमेलीची फुले लावण्यात व्यस्त होती. अॅडव्होकेट ‘किराना देवाडिगा’ यांनी कोरोनाच्या काळात गच्चीवर चमेलीच्या फुलांची लागवड सुरू केली. व्यावसायिक दृष्ट्या वकील असणारी किराना ही एक शेतकरी आहे. त्यामुळे जेव्हा साथीच्या रोगाने जग ठप्प झाले होते तेव्हा तिने आपला वेळ अजिबात वाया घालवला नाही. तिने यावेळी रस्त्यांवरील विक्रेत्यांकडून भांडी आणि जवळच्या नर्सरीमधून चमेलीची रोपे आणि बिया विकत घेतल्या.

तीन महिन्यांत मोठी कमाई
किरानाने सुमारे 90 उडुपी चमेलीची झाडे, भांडी आणि खत आणले. यासाठी त्यांनी 12 हजार रुपये खर्च केले. किराना यांनी चांगले उत्पन्न मिळण्यासाठी सहा महिने वाट पाहिली. तीन महिन्यांच्या कालावधीत त्याने 85,000 रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा घेतली
एका वृत्तानुसार, जेव्हा किराना यांना विचारण्यात आले की त्यांनी कोरोनाच्या काळात त्यांची स्वप्ने कशी पूर्ण केली, तेव्हा त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या एका उदाहरणाने उत्तर दिले की, “स्वप्न ते नसते जे तुम्ही झोपेत पाहता, स्वप्न ते असते जे झोपू देत नाही.” जर तुमच्यात स्वप्नांचा पाठलाग करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ती नक्कीच पूर्ण करू शकता.

youtube कडून मदत
YouTube व्हिडिओ आणि नर्सरी मालक यांकडूनच किराना याना मार्गदर्शन मिळाले. आता तिचे पती आणि बहिणीही या कामात हातभार लावतात. त्याच्या काही बहिणींनी तर स्वत: चमेलीची लागवड सुरू केली आहे.

वेळेचा समतोल
किराना यांसाठी वेळेचे व्यवस्थापन करणे हे निश्चितच आव्हान ठरले आहे. ते कुटुंब, काम आणि बागकाम यांत योग्य संतुलन राखायला शिकली आहे. त्यांचा हा विशेष प्रवास खरोखरच सर्वांना प्रेरणा देणारा आहे . तुम्‍ही देखील छतावर भाजीपाला, फळे आणि फुले उगवू शकता. काही लोक आता गच्चीवर भारतीय भाज्यांबरोबरच परदेशी भाज्याही पिकवतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...