अहमदनगर। नगर सह्याद्री
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात गावो- गावो साखळी उपोषण केले जात आहे. सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे यासाठी शासनाकडे मागणी करणार असूण मराठा आरक्षणाला पाठींबा असल्याची माहिती महापौर रोहीणी शेंडगे यांनी दिली.
आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करीत आहेत. त्यांना राज्यभरातून पाठींबा दिला जात आहे. यात ठिकठिकाणी आंदोलने, साखळी उपोषण केले जात आहे. मराठा समाजास आरक्षण मिळणेसाठी राज्यातील विविध गावातील नागरीक, युवक आत्महत्या करीत आहे.
मनोज जरांगे पाटील यांची देखील उपोषणामुळे तब्येत खालावली आहे. मराठा समाजास आरक्षण मिळणे अवश्यक आहे. शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पक्षाच्या वतीने पाठींबा देउन शासनाकडे आरक्षण देण्याची मागणी करनार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.