spot_img
अहमदनगरAhmednagar crime : अतिक्रमणावरून गौरी घुमट परिसरात राडा

Ahmednagar crime : अतिक्रमणावरून गौरी घुमट परिसरात राडा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
Ahmednagar crime : अतिक्रमण काढण्यावरून गौरी घुमट परिसरात दोन गटात हाणामारीची घटना घडली. लोखंडी गज, वीट, कुर्हाडीने केलेल्या मारहाणीत दोन्ही गटाचे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

बबन भाऊराव आढाव (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज चंद्रकांत नामदे, पौर्णीमा सुरज नामदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी सहाच्या सुमारास महानगरपालिकेचे कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी आले होते. ते घराच्या पाठीमागील बाजूला अतिक्रमण भागावर मार्कींग करत असताना सुरज हा अतिक्रमण काढण्यावरून हुज्जत घालू लागला. सुरज याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याने त्याच्या पत्नीला बोलून घेतले.  तिने माझ्या पत्नीला मारहाण केली. तसेच सुरज याने कुर्हाडीने माझ्या डोयात मारहाण करून गंभीर दुखापत केली. आमच्या नादी लागाल तर तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीत बबन आढाव जखमी झाले आहेत.

दुसर्‍या गटाचे सुरज चंद्रकांत नामदे (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबन भाऊराव आढाव, आरती बबन आढाव, बबनचा भाऊ व भावजाई, दिनेश सुनील बिटला (सर्व रा. गौरी घुमट) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माझ्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आल्याने घराच्या पाठीमागील बाजूला गेलो असता बबन आमच्या टॉयलेटचे पत्रे काढत होता. त्याला विचारणा केली असता त्याने वीटाने मारहाण केली.

आरतीने बबनचा भाऊ व भावजाई, दिनेश यांना बोलून घेतले. आरती, बबनचा भाऊ व भावजाई यांनी मला पकडले व बबन याने लोखंडी गजाने मारहाण केली. बबनचा भाऊ व भावजाई, दिनेश यांनी वीटाने मारहाण केली. तु आमच्या विरूध्द अर्ज करतो काय असे बोलून शिवीगाळ करून पुन्हा आमच्या नादी लागला तर जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली. सदर भांडणाच्या वेळी माझ्या खिशातील मोबाईल व पैसे कोठेतरी पडून गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...