spot_img
अहमदनगरAhmednagar : दुधाला बाजार भाव देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको, शेतकरी उतरले रस्त्यावर

Ahmednagar : दुधाला बाजार भाव देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको, शेतकरी उतरले रस्त्यावर

spot_img

श्रीगोंदा / नगर सह्याद्री : दुधाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. याच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुका व शहर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने शहरात महात्मा फुले सर्कल या ठिकाणी दोन तास रास्तारोको करण्यात आला. यावेळी दूध उत्पादक शेतकर्‍यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

दुधाला बाजार भाव मिळावा यासाठी शेतकरी मागील काही दिवसापासून पाठपुरावा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर दूध उत्पादक संघर्ष समितीने मागील आठवड्यात रास्तारोकोचे निवेदन तहसीलला दिले होते.

याच पार्श्वभूमीवर सरस्वती नदीच्या पुलावर महात्मा फुले सर्कल येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी बीआरएसचे नेते घनश्याम शेलार, टिळक भोस, भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र म्हस्के, माजी नगराध्यक्ष एमडी शिंदे, उपनगराध्यक्ष सुधीर खेडकर, नगरसेवक संतोष कोथिंबीरे, प्रशांत गोरे,

सतीश मखरे, प्रदीप लोखंडे, मंगेश मोटे, सागर रसाळ आदींसह शेतकरी उपस्थित होते.यावेळी शेतकर्‍यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. दुधाला भाव देण्याची मागणी केली. या वेळी दूध उत्पादक संघर्षसमितीचे अध्यक्ष सोनू कोथिंबीरे यांनी मागण्या मान्य न झाल्यास तालुयातून एकही दुधाचा टँकर तालुयाबाहेर जाऊ देणार नाही असा इशारा दिला.

पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे
पालकमंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दुधाला ३४ रुपये हमीभाव जाहीर केला असला तरी तो मिळत नाही. त्याबद्दल त्यांनी स्वतः दूध दरामध्ये लक्ष घालून शेतकर्‍यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी – बीआरस नेते, घनश्याम शेलार

उपोषणाचा इशारा
शेतकर्‍यांच्या दूध, तूर, कापूस या मालाला राज्य सरकारकडून व्यवस्थित बाजारभाव न मिळाल्यास ३० तारखे नंतर सर्व शेतकर्‍यांना बरोबर घेऊन साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा भाजप नेते राजेंद्र म्हस्के यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...