spot_img
अहमदनगरAhmednagar : अभिनेता मकरंद अनासपुरेंनी घेतले जातेगाव येथील भैरवनाथांचे दर्शन

Ahmednagar : अभिनेता मकरंद अनासपुरेंनी घेतले जातेगाव येथील भैरवनाथांचे दर्शन

spot_img

सुपा / नगर सह्याद्री : मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी श्री काळभैरवनाथ देवस्थान, जातेगाव या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी विजय गायकवाड यांनी देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार केला.

यावेळी त्यांना देवस्थानची माहिती देताना सांगितले की, देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध विकास कामे पूर्ण झाली असून काही विकास कामे सुरू आहेत. यंदा पावसाने ओढ दिली असून पाऊस मुबलक प्रमाणात झाल्यास मंदिर परिसरात धबधबे खळखळून वाहतात.

यादरम्यान पर्यटकांची मोठी गर्दी असते. देवस्थान ट्रस्ट व परिसरातील भाविकांच्या वतीने दर रविवारी महाआरती नंतर प्रसादाचे आयोजन करण्यात येते आदी माहिती त्यांना देण्यात आली.

यावेळी सत्काराला उत्तर देताना मकरंद अनासपुरे यांनी देवस्थानच्या विकास कामाबद्दल कौतुक केले.  निसर्गाच्या कुशीत असलेल्या देवस्थान परिसरात मला एक चित्रपट शूटिंग करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

लवकरच आपण यावर एक मीटिंग घेऊन त्याचे नियोजन करू असे आश्वासन दिले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनीता पोटघन, देवस्थानचे सचिव सचिन ढोरमले, गावातील युवा नेते सोमनाथ ढोरमले, संदीप ढोरमले, राजेंद्र भोगाडे, भाऊसाहेब पोटघन, मारुती पोटघन, बाळू शेलार आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...

जय-वीरूसारख्या जिवलग मित्रांनी टोकाचं पाऊल उचल! दोघांनीही केली आत्महत्या, शहरात खळबळ, कारण काय?

Crime News : सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर...

उपमुख्यमंत्री अजित दादांच्या शिलेदारांनी फोन फिरवला; मोठा प्रश्न सुटला? नागरिकांनी मानले आभार? शहरात कुणाच्या नावाची चर्चा…

Politics News : कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे...