spot_img
अहमदनगरराज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगरचे सुरवसे, शेळके, लटके चमकले

राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगरचे सुरवसे, शेळके, लटके चमकले

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
शहरात सुरु असलेल्या महाराष्ट्र क्सरी कुस्ती स्पर्धे बरोबरच वरिष्ठ गट अजिंक्यपद कुस्ती स्पर्धाही अत्यंत रोमहर्षक व अतितुटीच्या होत आहेत. यामध्ये अहिल्यानगरचे नवोदित मल्ल चमकदार कामगिरी करत आहेत. शुकवारी झालेल्या माती व गादी विभागातील चुरशींच्या लढतीत ऋषिकेश शेळकेने रौप्यपदक, विश्वजीत सुरवसे कांस्यपदक पटकावले तर संदीप लटके याने चुरशीची झुंज दिली.

माती विभागातील ६१ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या स्वरूप जाधवने अहिल्यानगरच्या विश्वजीत सुरवसे याचा ११-०, तर कोल्हापूर शहराच्या सुरज अस्वल याने अत्यंत चुरशीच्या लढतीत पुण्याच्या अमोल वालगुडे याचा ३-२ अशा गुणाधिक्यांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत कोल्हापूर शहराच्या सुरज अस्वलेने अटीतटीच्या उत्कंठावर्धक लढतीत कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वरूप जाधवचा ३-२ गुण फरकाने निसटसा पराभव करून सुवर्णपदक पटकावले तर स्वरूपला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्यपदकाच्या लढतीत पुण्याच्या अमोल वालगुडे याने अहिल्या नगरच्या विश्वजीत सुरवसे याचा १०-० अशा गुणाधिक्यांनी पराभव करून कांस्यपदक पटकावले.

माती विभागातील ७९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत अहिल्यानगरच्या ऋषिकेश शेळके याने जालन्याच्या प्रमोद काळेचा १२-१, तर साताऱ्याच्या संदेश शिपकुले याने धक्कादायक निकालाची नोंद करत सांगलीच्या नाथा पवारचा ११-० अशा गुण फरकाने एकतर्फी पराभव करत अनपेक्षितपणे अंतिम फेरीत प्रवेश केला. ऋषिकेश शेळके आणि संदेश शिपकुले यांच्या झालेल्या अंतिम लढतीत संदेशने ऋषिकेशचा १२-२ अशा गुणाधिक्यांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले तर ऋषिकेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्य पदकासाठी प्रमोद काळे आणि नाथा पवार यांच्या झालेल्या लढतीत नाथा पवारने प्रमोद काळेचा ११-० अशा गुण फरकाने पराभव करत कांस्यपदक जिंकले.

गादी विभागातील ६१ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या अजय कापडे याने नाशिकच्या पवन ढोन्नरचा ११-१, तर धुळ्याच्या पुरुषोत्तम विसपुते याने सांगलीच्या पांडुरंग माने याचा ६-३ अशा गुणाधिक्यांनी पराभव करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अंतिम लढत ही अजय कापडे व पुरुषोत्तम विसपुते यांच्यात झाली यामध्ये अजयने पुरुषोत्तमचा १०-० अशा गुणाधिक्यांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले तर पुरुषोत्तमलि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत नाशिकच्या पवन ढोन्नर याने बीडच्या विश्वास तावरे याला चितपट करून कांस्यपदकावर आपले नाव कोरले. तर दुसऱ्या लढतीत सांगलीच्या पांडुरंग माने याने अहिल्यानगरच्या अभिजीत वाघुलेचा १५-७ अशा गुणाधिक्यांनी पराभव करून कांस्यपदक पटकावले.

माती विभागातील ६१ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या स्वरूप जाधवने अहिल्यानगरच्या विश्वजीत सुरवसे याचा ११-०, तर कोल्हापूर शहराच्या सुरज अस्वल याने अत्यंत चुरशीच्या लढतीत पुण्याच्या अमोल वालगुडे याचा ३-२ अशा गुणाधिक्यांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम लढतीत कोल्हापूर शहराच्या सुरज अस्वलेने अटीतटीच्या उत्कंठावर्धक लढतीत कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वरूप जाधवचा ३-२ गुण फरकाने निसटसा पराभव करून सुवर्णपदक पटकावले तर स्वरूपला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्यपदकाच्या लढतीत पुण्याच्या अमोल वालगुडे याने अहिल्या नगरच्या विश्वजीत सुरवसे याचा १०-० अशा गुणाधिक्यांनी पराभव करून कांस्यपदक पटकावले.

माती विभागातील ७९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत अहिल्यानगरच्या ऋषिकेश शेळके याने जालन्याच्या प्रमोद काळेचा १२-१, तर साताऱ्याच्या संदेश शिपकुले याने धक्कादायक निकालाची नोंद करत सांगलीच्या नाथा पवारचा ११-० पराभव केला.

गादी विभागात ७९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीची लढत हि सोलापूरच्या शुभम मगर व अहिल्यानगरच्या संदीप लटके यांच्यात अत्यंत चुरशीची झाली. दोघांनीही कुस्तीच्या निर्धारित वेळेत २-२ असे समान गुण घेतले होते. मात्र या लढतीत शुभमने शेवटचा गुण घेतल्यामुळे नियमानुसार शुभम मगर विजयी ठरला आणि तो अंतिम फेरीत दाखल झाला. दुसऱ्या उपांत्य फेरीत पुण्याच्या केतन घारे याने मुंबईच्या सुजित यादवचा ८-१ अशा गुणाधिक्यांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम लढत हि केतन घारे व शुभम मगर यांच्यात झाली यामध्ये शुभमने केतनचा ८-२ अशा गुणाधिक्यांनी पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले तर केतनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत अहिल्यानगरच्या संदीप लटके याने कोल्हापूरच्या विनायक वारस्कर याचा ११-०, तर मुंबई उपनगरच्या सुजीत यादव याने बीडच्या विवेक शेडगे याचा ९-६ अशा गुणाधिक्यांनी पराभव करत कांस्यपदक जिंकले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...