spot_img
अहमदनगरपारनेर - विसापूर रस्त्यावर बाबुर्डी येथील पुलावर मोठा खड्डा; अपघाताचा धोका वाढला

पारनेर – विसापूर रस्त्यावर बाबुर्डी येथील पुलावर मोठा खड्डा; अपघाताचा धोका वाढला

spot_img

 

सुपा / नगर सह्याद्री
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील पारनेर – विसापूर रस्त्यावर बाबुर्डी येथील बस क्रमांक १ लगत असलेल्या पुलावर मोठा खड्डा पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. बांधकाम विभागाने पुलावरील खड्डा बुजवून रस्ता सुरळीत करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थ, प्रवाशी यांनी केली आहे.

मागील महिन्यात तालुक्यासह बाबुर्डी परिसरात मुसळधार पावसाने परीसर झोडपून काढला, बाबुर्डी बस क्रमांक १ लगत असलेल्या पुलाची उंची जमीनीच्या खाली असल्याने या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले यादरम्यान हा रस्ता सुमारे दहा ते बारा तास बंद होता. यावेळी शाळेत जाणारे विद्यार्थी यांना शाळा बुडवावी लागली तर प्रवाशांना रात्र भर रस्त्याच्या कडेला ताटकळत बसावे लागले, कंपनी कामगार, दुध उत्पादक शेतकरी व प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना लागला.

सुपा नवीन वसाहत फेज २ येथील वाहतूक तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतीमाल मुख्य बाजारपेठ असलेल्या पारनेर, सुपा, अहिल्यानगर, शिरूर, पुणे याठिकाणी नेण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो, पावसाळ्यात शालेय विद्यार्थी, दुध उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ, औद्योगिक वसाहतीमधील कामगार, वृद्ध व्यक्ती यांना पावसाळ्यात नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. पुलाची उंची कमी असल्याने नुकत्याच झालेल्या पावसाने मोठा पूर आला होता या पुरात एका तरुणाने मोटारसायकल घातली असता मोटारसायकल सह तो वाहून गेला, दैव बलवत्तर म्हणून तो पुलाच्या कठड्याला अडकला मोटारसायकल दुसऱ्या दिवशी तरूणांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावरील पुलावर मधोमध मोठा खड्डा पडल्यामुळे मोटारसायकल चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने याठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या पुलाची दुरूस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...